महाराष्ट्रातल्या राजकारणातील प्रमुख कुटुंबीयांपैकी एक कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब. हे ठाकरे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहे. पण आता या कुटुंबातील एक सदस्य अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र जयदेव ठाकरे यांचा मुलगा लवकरच बॉलिवूडमधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे. जयदेव ठाकरे यांच्या मुलाचं नाव ऐश्वर्य ठाकरे असं असून तो आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘जवान’ दिग्दर्शकाचा मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान
प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटातून ऐश्वर्य ठाकरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अद्याप या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली नसून तो लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं बोललं जात आहे. राजकीय वारशातून आलेल्या ऐश्वर्यने कुटुंबीयांचा पारंपारिक मार्ग न निवडता स्वत:च्या कतृत्वावर पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. २०१५ साली रिलीज झालेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या माध्यमातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. या अनुभवातून त्याला चित्रपट निर्मितीचीही समज मिळाली.
‘मुंज्या’च्या यशानंतर सुहास जोशींचा ‘खोताची वाडी’मधील पहिला लूक चर्चेत!
मायकेल जॅक्सनचा मोठा चाहता असलेला ऐश्वर्यची नृत्यातील आत्मविश्वास आणि रंगमंचावरील उपस्थिती लक्षणीय आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की, तो उत्तम डान्सर देखील आहे. अभिनेता आणि निर्माता निखिल द्विवेदीने एकदा म्हटले होते, “तो नक्की लक्ष ठेवण्यासारखा आहे.” ही टिप्पणी त्या वेळी साधी वाटली असली, तरी आज ती त्यांच्या क्षमता ओळखणारी दूरदृष्टी ठरते आहे. अनुराग कश्यप यांच्यासारख्या गंभीर आणि सखोल विषय हाताळणाऱ्या दिग्दर्शकासोबत तो दमदार पदार्पण करतो आहे. कोणत्याही मोठ्या प्रमोशनल मोहिमेशिवाय, ऐश्वर्य आपल्या कामातून स्वतःची ओळख निर्माण करत आहेत.