Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हंगामा OTT सादर करते ‘पर्सनल ट्रेनर’, सस्पेन्स आणि षड्यंत्राची कथा; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

हंगाम OTT नवीन मालिका घेऊन येत आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव 'पर्सनल ट्रेनर' आहे. ही मालिका जानेवारीच्या २०२५च्या २८ तारखेला प्रदर्शित केला जाणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 30, 2025 | 02:50 PM
हंगामा OTT सादर करते ‘पर्सनल ट्रेनर’, सस्पेन्स आणि षड्यंत्राची कथा; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Follow Us
Close
Follow Us:

भारतातील आघाडीच्या डिजिटल मनोरंजन प्लॅटफॉर्म हंगामाने नवी क्राइम थ्रिलर मालिका ‘पर्सनल ट्रेनर’ सादर केली आहे. ही मालिका 28 जानेवारी 2025 रोजी हंगामा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. यात टिना दत्ता, गुलशन नैन आणि साहिब तग्रा प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. तसेच इतर काही प्रसिद्ध कलाकार मंडळी या मालिकेतून दिसून येणार आहे. मुंबईतील ग्लॅमरस जिम कल्चरच्या पार्श्वभूमीवर फिरणारी ही कथा महत्त्वाकांक्षा, प्रेम आणि धोकादायक घटनांच्या गुंतागुंतीचा शोध घेते. टिना दत्ता यांनी नेहा धर्मराजन या विवाहित महिलेची भूमिका साकारली आहे, जिचे पर्सनल ट्रेनर अनिशसोबत विवाहबाह्य संबंध असतात. गुलशन नैन यांनी अनिशची भूमिका साकारली असून साहिब तग्रा एका महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही सीक्रेट लव्हस्टोरी अनिशच्या रहस्यमय मृत्यूने संपते, ज्यामुळे कथा एका सस्पेन्सच्या भोवऱ्यात अडकते.

Raftaar Wedding: रफ्तार दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात? सोशल मीडियावर व्हिडीओ आणि लग्न पत्रिका व्हायरल!

हंगामाचे सीईओ सिद्धार्थ रॉय यांनी सांगितले की, “पर्सनल ट्रेनरची कथा मानवी स्वभावाच्या गुंतागुंतीवर प्रकाश टाकते आणि तिचे अनेक ट्विस्ट प्रेक्षकांना गुंतवून ठेवतील.” टिना दत्ता यांनी आपला अनुभव शेअर करताना सांगितले, “नेहा ही भूमिका माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होती. तिच्या प्रवासात आलेल्या अनेक भावनिक छटांनी मला प्रभावित केले. प्रेक्षक या मालिकेवर नक्कीच प्रेम करतील.”

गुलशन नैन म्हणाले, “पर्सनल ट्रेनर ही एक कथा आहे जी खरोखरच प्रेरणादायी आहे. ही भूमिका मला ऑफर झाल्यावर, पटकथा वाचण्यापूर्वीच मी अमित खन्नाच्या दृष्टिकोनावर सहज विश्वास ठेवला. मी मालिकेच्या विचारशील लेखनाकडे आणि दिग्दर्शनाकडे आकर्षित झालो. मला खात्री आहे की कथेमध्ये असलेल्ी भावनिक प्रामाणिकता प्रेक्षकांवर कायमची छाप सोडेल.” साहिब तग्रा म्हणतात, “पर्सनल ट्रेनर ही एक अशी कथा आहे जी खरोखरच प्रेरणादायी आणि प्रामाणिक आहे, संघर्ष, आकांक्षा आणि नातेसंबंधांच्या वास्तविक जीवनातील थीममध्ये खोलवर जाते. ती आपल्या सर्वांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा शोध घेते. या प्रोजेक्टवर काम करणे हा एक समृद्ध प्रवास होता आणि मला विश्वास आहे की कथेतील भावना आणि प्रामाणिकपणा प्रेक्षकांशी वैयक्तिक पातळीवर खरोखरच जोडला जाईल.” ही मालिका हंगामा ॲप आणि भागीदार प्लॅटफॉर्म्सवर Tata Play Binge, Watcho, BSNL, PlayboxTV, RailWire Broadband, Airtel Xstream Play, आणि Dor Tv वर उपलब्ध होणार आहे.

राजकुमार राव आणि पत्रलेखाने चाहत्यांना दिली गुड न्यूज; सुंदर नोटसह सोशल मीडियावर केली पोस्ट शेअर!

हंगामा डिजिटल मीडियाच्या या प्लॅटफॉर्मवर 5,000 हून अधिक चित्रपट, 3 कोटींहून अधिक गाणी, 1,500 शॉर्ट फिल्म्स आणि विविध भाषांतील सामग्रीचा समावेश आहे. हंगामा Originals ने डिजिटल कथाकथनाच्या परिभाषा बदलत नवनवीन शो सादर केले आहेत. प्रेक्षकांनी ‘पर्सनल ट्रेनर’ मालिका पाहण्याचा अनुभव घ्यावा, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Hungama ott presents personal trainer a story of suspense and conspiracy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • crime web series

संबंधित बातम्या

शांत! तिचं लक्ष आपल्यावरच आहे… दिसायला रॉबर्ट पण ‘ती’ राहते; एक थरारक अनुभव
1

शांत! तिचं लक्ष आपल्यावरच आहे… दिसायला रॉबर्ट पण ‘ती’ राहते; एक थरारक अनुभव

“… त्यामुळे मनात भिती होती” अभिनेता क्षितीश दातेचा ‘मिस्ट्री’ वेबसीरीजमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता?
2

“… त्यामुळे मनात भिती होती” अभिनेता क्षितीश दातेचा ‘मिस्ट्री’ वेबसीरीजमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता?

“वक्त से पहले मिलती है खबर…” शौचालय सांभाळणारा वत्स्या बनतो शहरातला मोठा शेठ; ‘ही’ सिरीज पहिलीये का?
3

“वक्त से पहले मिलती है खबर…” शौचालय सांभाळणारा वत्स्या बनतो शहरातला मोठा शेठ; ‘ही’ सिरीज पहिलीये का?

Chandan Arora Exclusive: “क्राईम स्टोरीमध्ये मला एकच कथानक आणायचं नव्हतं…” ‘कनखजुरा’ची कथा दिग्दर्शकांना कशी सुचली?
4

Chandan Arora Exclusive: “क्राईम स्टोरीमध्ये मला एकच कथानक आणायचं नव्हतं…” ‘कनखजुरा’ची कथा दिग्दर्शकांना कशी सुचली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.