मुंबई : अभिनेता आमिर खान (Amir Khan) कायम चर्चेत राहतो. काही दिवसापुर्वी त्याच्या लेकीचा साखरपुडा पार पडला. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आलंय. त्याच निमित्त म्हणजे त्याने त्याच्या ऑफिसमध्ये केलेली पुजा. आमिरने खास पारंपारिक पद्घतीने ऑफिसमध्ये पुजा केली. त्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
[read_also content=”१९६६ मध्ये तामिळनाडूच्या मंदिरातून गायब झालेली कृष्णाची मूर्ती सापडली अमेरिकेत! https://www.navarashtra.com/latest-news/the-idol-of-krishna-which-disappeared-from-the-temple-of-tamil-nadu-was-found-in-america-nrps-352140.html”]
आमिरनं त्याच्या ऑफिसमध्ये पूजेचे आयोजन केले. यावेळी आमिर खान आणि त्याची एक्स वाईफ किरण राव (Kiran Rao) देखील उपस्थित होती. यावेळी त्यांनी आरती देखील केली. आमिर आणि किरण यांच्यासोबतच आमिर खान प्रोडक्शन्सच्या स्टाफ मेंबर्सनं देखील या पूजेला हजेरी लावली. नुकतेच सोशल मीडियावर आमिरच्या आमिर खान प्रोडक्शन्सच्या ऑफिसमध्ये झालेल्या पूजेचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोला अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. आमिरच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचा दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनी सोशल मीडियावर या पुजेचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आमिर हा कलश पूजन करताना दिसत आहे तर किरण ही आरती करताना दिसत आहे. या फोटोला नेटकऱ्यांची चांगलीच पंसती मिळत आहे. तर आमिरनं केलेली वेशभुषाही फॅन्सना खूप आवडली असून त्याचही कौतुक करताना दिसत आहे. या फोटोमध्ये आमिर हा डोक्यावर टोपी, चष्मा, ब्यू डेनिम आणि जॅकेट अशा लूकमध्ये दिसत आहे.