(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“Indian Idol 12” या शोमधून घराघरात पोहोचलेली गायिका सायली कांबळे लवकरच आई होणार आहे. सायलीने तिच्या इन्स्टाग्रामवर डोहाळ्याच्या जेवणाचे फोटो शेअर केले आहेत.त्या फोटोंमध्ये ती पारंपरिक मराठी साडी, नथ, फुलांचे दागिने घातलेली दिसत असून तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाचा आनंद स्पष्ट आहे. फोटो शेअर करत तिने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. सायलीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिच्यासह पती धवलही आहे. या फोटोबरोबर त्यांनी एक पोस्टही शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी आई बाबा होणार असल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत सायलीने पोस्टमध्ये एक भावनिक कॅप्शनही लिहिले आहे. यात तिने देवाचे आभार मानले आहेत, तर लवकरच नवा पाहुणा येणार असल्याची माहिती तिने दिली आहे.
या पोस्टमध्ये सायली म्हणते, ”मी आणि धवल एक सुंदर बातमी तमुच्याबरोबर शेअर करत आहोत, आमचं छोटंसं चिमुकलं बाळ लवकरच आमच्या आयुष्यात येणार आहे! आम्ही आमच्या आयुष्यातल्या या सगळ्यात सुंदर प्रवासाला सुरुवात करत आहोत, आणि आमच्या या लाडक्या बाळाला भेटण्यासाठी आम्ही फारच उत्सुक आहोत. आता आमच्या आयुष्यात त्याच्या रूपानं खूप सारं प्रेम येणार आहे. त्यामुळए आमचं मन आनंद आणि उत्सुकतेनं भरून आलं आहे.
Bigg Boss 19 : अभिषेक बजाजनंतर कोण झाला घराचा नवा कॅप्टन? गौरव खन्ना की फरहाना भट्ट
3 वर्षांनी कमबॅक, ‘अबोली’मध्ये खलनायिका बनून परतली लोकप्रिय अभिनेत्री
या पोस्टखाली अनेकांनी सायलीला शुभेच्छा दिल्या आहेत ‘इंडियन आयडल’मधील गायक मित्र-मैत्रिणींनी सायलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसंच सायलीच्या अनेक चाहत्यांकडून शुभेच्छा अन् कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
सायली कांबळेने ‘इंडियन आयडल १२’ या लोकप्रिय शोमध्ये तिने आपल्या गोड आवाजाने आणि अप्रतिम सादरीकरणाने प्रेक्षकांचं मन जिंकले.‘इंडियन आयडल’नंतर तिने मराठी चित्रपटांसाठी आणि वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी गाणी गायली आहेत. २४ एप्रिल २०२२ रोजी सायलीने प्रियकर धवलसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर लग्नाच्या तीन वर्षांनी दोघांनी आई- बाबा होणार असल्याची गोड बातमी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना दिली आहे.