फोटो सौजन्य - Instagram
द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये किकू शारदा आणि कृष्ण अभिषेक यांची जोडी मागील अनेक वर्षापासून प्रसिद्ध आहे. किकु शारदा है अनेक वेगवेगळ्या अवतारामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. त्यांनी मुलीचे कधीकधी अनेक रोल केले आहेत तर कधी ते एक गाव वाले दूधवाल्याचे देखील कॅरेक्टर मध्ये पाहायला मिळाले आहे. सुपरस्टार गोविंद यांचा भाचा कृष्णा अभिषेक याने अनेकदा शाहरुख खान किंवा सपनाच्या कॅरेक्टरमध्ये त्याला चाहत्यांनी पसंत केले आहे.
‘कुली’ नंतर नागार्जुनने केली स्वतःच्या १०० व्या चित्रपटाची घोषणा, अभिनेता साकारणार खास भूमिका
आता द ग्रेट इंडियन कपिल सेटवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये कीकु शारदा आणि कृष्णा अभिषेक हे दोघेही शोचा सराव करताना भांडताना दिसत आहे. या दोघांमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झालेला पाहायला मिळत आहे त्यांच्या अवतीभवती अनेक लोक उभे आहेत. हा प्रँक आहे की खरं भांडण आहे या संदर्भात अजून पर्यंत सत्य बाहेर आलेले नाही. या व्हिडिओच्या खाली अनेक प्रेक्षकांनी लिहिले आहे की हे स्क्रिप्टेड असेल कारण या आधी देखील असे झालेले आहे.
एका युजरने लिहिले आहे की या व्हिडिओमध्ये जो लॅपटॉप घेऊन बसला आहे तो तर पॉपकॉर्न घेऊन देखील बसला आहे. एका व्यक्तीने टीका करत लिहिले आहे की हा कृष्णा दहा वर्षे झाले एकच स्क्रिप्ट घेऊन त्याच प्रकारे झगडत आहे. मागील आठवड्यामध्ये द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये विशाल दादलानी शेखर शान आणि नीती मोहन हे पाहुणे म्हणून शोमध्ये आले होते. आतापर्यंत या सीझनचे नऊ एपिसोड झाले आहेत.. परिणीती चोप्रा आणि तिचा पती राघव चड्डा हा देखील या शोमध्ये पाहून आला होता.
रक्षाबंधन स्पेशल एपिसोड मध्ये शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी या दोघी बहिणी त्याचबरोबर हुमा कुरेशी आणि साकिब सलीम हे दोघे बहिण भाऊ देखील कपिलच्या शोमध्ये आले होते. द ग्रेट इंडियन कपिल शोच्या सीजन तीन च्या पहिल्याच भागामध्ये सलमान खान आला होता यावेळी सुनील ग्रोवर याने सलमान खानची मिमिक्री केली होती तर प्रश्न अभिषेकने शाहरुख खानची भूमिका साकारली होती.