धनश्री वर्माने सोडले घटस्फोटानंतर मौन (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
धनश्री वर्माने पहिल्यांदाच क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबतच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. घटस्फोटाचा निकाल येण्यापूर्वी ती न्यायालयात खूप भावनिक झाल्याचे अभिनेत्री आणि कोरिओग्राफरने उघड केले. घटस्फोटाच्या दिवशी चहलच्या टी-शर्टवर ‘Be Your Own Sugar Daddy’ लिहिले होते त्यावरदेखील आपले म्हणणे बेधडकपणे सांगितले आहे. अभिनेत्रीने सांगितले की तिने या सर्व स्टंटवर क्रिकेटपटूला उत्तर देणे आवश्यक मानले नाही कारण हे तिच्यावरील संस्कार नाहीत.
‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’च्या पॉडकास्टमध्ये बोलताना धनश्री वर्मा म्हणाली- ‘मला अजूनही आठवते जेव्हा मी तिथे कोर्टात उभी होते आणि निकाल जाहीर होणार होता, जरी आम्ही मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार होतो, परंतु जेव्हा ते घडत होते तेव्हा मी खूप भावनिक झाले. मी अक्षरशः सर्वांसमोर ओरडू लागले. त्यावेळी मला काय वाटत होते ते मी वर्णनही करू शकत नाही.’ युझवेंद्र चहलपासून घटस्फोटावर धनश्री पहिल्यांदाच बोलली, टी-शर्ट स्टंटवरही प्रतिक्रिया दिली
‘मी फक्त ओरडत होते आणि रडत होते’
धनश्रीने पुढे या पॉडकास्टमध्ये सांगितले की, ‘मला फक्त एवढेच आठवते की मी रडत होते, मी फक्त ओरडत होते. मला अगदी चांगले आठवत आहे की, हे सर्व घडले आणि तो (युजवेंद्र चहल) प्रथम बाहेर गेला.’ घटस्फोटाच्या दिवशी युजवेंद्र चहल ‘बी युअर ओन शुगर डॅडी’ लिहिलेला टी-शर्ट घालून गेला होता. याबद्दल धनश्री म्हणाली- ‘तुम्हाला माहिती असतं की लोक तुम्हालाच दोष देणार आहेत आणि खरं सांगायचं तर हा टी-शर्ट स्टंट झाला आहे हे मला कळण्यापूर्वीच, आम्हाला सर्वांना माहीत होते की लोक मला यासाठी दोष देणार आहेत.’
धनश्री चहलच्या टी-शर्ट स्टंटवरही बोलली
अभिनेत्रीने पुढे सांगितले की, ‘मला वाटते की आपल्याला या प्रकरणात खूप परिपक्व असले पाहिजे. मी हा मार्ग निवडला आहे. प्रौढ होणे आणि लोकांचे लक्ष वेधण्यासाठी बालिश विधाने करणे या दोन्हीपैकी मी परिपक्वता हा पर्याय निवडलाय. चुकीचा हा मार्ग मी निवडणार नाही कारण मला माझ्या किंवा त्याच्या कौटुंबिक मूल्यांना हानी पोहोचवायची नाही. आपल्याला आदर राखावा लागेल हाच विचार मी केला.’
धनश्री म्हणते- ‘तुम्ही जे काही लोकांसमोर सांगता किंवा बोलता ते फक्त झलक असते. एक महिला म्हणून आपल्याला ते जपून ठेवायला, बांधून ठेवायला शिकवले जाते. कारण आपण आपल्या समाजाला चांगले ओळखतो, आपल्या आई आपल्या समाजाला चांगले ओळखतात. तुम्हाला नक्कीच कोणते लेबल लावले जाईल याची तुम्हाला पूर्ण कल्पना असते’
युझवेंद्रची मुलाखत
याआधी युझवेंद्रने आपल्या घटस्फोटबाबत मौन सोडले होते आणि त्याने स्पष्ट केले होते की, मी कधीही कोणालाही फसवलेले नाही. त्यामुळे आता या दोघांनी नक्की कोणत्या कारणामुळे घटस्फोट घेतला हे त्या दोघांनाच माहीत. पण तरीही लोक तर्कवितर्क लावणं सोडणार नाहीत हे नक्की!
Yuzvendra Chahal : घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान युझवेंद्र चहलची सोशल मीडियावर भावुक पोस्ट
पहा व्हिडिओ