Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेत्री सुरभी हांडे नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, चित्रीकरणाला सुरुवात; पाहा Photos

'जय मल्हार' मालिकेत 'म्हाळसा' भूमिकेतून घरोघरी पोहोचलेली गुणी अभिनेत्री सुरभी हांडे अनुश्री फिल्म्सच्या नव्या प्रोजेक्टमधून झळकणार आहे. तिने नुकतेच नव्या प्रोजेक्टच्या मुहूर्ताचे फोटोज सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 01, 2025 | 06:39 PM
अभिनेत्री सुरभी हांडे नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, चित्रीकरणाला सुरुवात; पाहा Photos

अभिनेत्री सुरभी हांडे नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, चित्रीकरणाला सुरुवात; पाहा Photos

Follow Us
Follow Us:

‘आंबट गोड’, ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ तसेच ‘जय मल्हार’ मालिकेत ‘म्हाळसा’ या भूमिकेतून घरोघरी पोहोचलेली गुणी अभिनेत्री सुरभी हांडे अनुश्री फिल्म्सच्या नव्या प्रोजेक्टमधून झळकणार आहे. तिने नुकतेच नव्या प्रोजेक्टच्या मुहूर्ताचे फोटोज सोशल मीडियावर शेयर केले आहेत. या फोटोवरून असे दिसते की या प्रोजेक्टच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. भावभक्ती विठोबा, गजानना, गाव कोकण, लढला मावळा रं, अशी सुंदर गाणी तसेच त्या दोघी, देवी, शालिनीझ होम किचन असे विविध सामाजिक विषयावर भाष्य करणारे शॉर्टफिल्म्स अनुश्री फिल्म्स अंतर्गत प्रदर्शित झाले आहेत. या नव्या प्रोजेक्टचे दिग्दर्शन शुभम घाटगे करत आहे. तर या प्रोजेक्टचे निर्माते मयूर तातुस्कर हे आहेत.

साई पल्लवीची तब्येत बिघडली, डॉक्टरांनी दिला बेड रेस्टचा सल्ला; नेमकं अभिनेत्रीला काय झालं ?

अभिनेत्री सुरभी तिच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगते, “वर्षातला हा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे. शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. मी फार उत्सुक आहे अनुश्री फिल्म्सच्या टीमसोबत काम करायला. आमच्या प्रोजेक्टच चित्रीकरण महाराष्ट्रातील काही दुर्गम भागात होणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे थोड अडव्हेंचर्स असणार आहे.”

निर्माते मयूर तातुस्कर त्यांच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगतात, “आमच्या अनुश्री फिल्म्सच्या नव्या वर्षातील नवीन प्रोजेक्टला नुकतीच सुरुवात अगदी दिमाखात आणि उत्साहात झाली आहे. आम्ही नेहमीच प्रेक्षकांसाठी हृदयाला भिडणाऱ्या कथा घेऊन आणण्याचा प्रयत्न करत असतो. या प्रोजेक्टमध्ये देखील तुम्हाला काहीतरी नव पाहण्याचा अनुभव मिळेल याची आम्हाला खात्री आहे. यावेळी आम्ही पहिल्यांदाच प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी यांच्या सोबत काम करत असून हा अनुभव अतिशय प्रेरणादायी ठरत आहे. सुरभी हांडे या मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री असून त्यांच्या अभिनयामुळे आणि कामातील उत्साहामुळे आमच्या टीमला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळाली. यामुळे आमच्याकडून एक सुंदर कलाकृती निर्माण होईल असा विश्वास आहे. अनुश्री फिल्म्सला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे त्यासाठी त्यांचे मनापासून आभार.”

 

Border 2: ‘ब्लॅक वॉरंट’ फेम परमवीर सिंग चीमा बनला सनी देओलच्या ‘बॉर्डर २’ चा भाग; अभिनेत्याने व्यक्त केला आनंद!

दिग्दर्शक शुभम घाटगे चित्रीकरणाविषयी सांगतो, “लहानपणी सुरभीची भूमिका असलेली मालिका टीव्हीवर आईसोबत बघितली होती. आज त्यांच्यासोबत काम करताना खूप भारी वाटतंय. शूट खूप दुर्गम ठिकाणी असल्यामुळे खूप कमी सुविधा आहेत. पण सुरभीचा आणि आमच्या टीमचा छान रॅपो जमला आहे. त्यामुळे शूट करताना फार मज्जा येईल. खूप उत्सुकता आहे शूट बद्दल. कारण धरणाचा भाग, जंगल, कच्चे रस्ते ह्यातून सगळे गियर घेऊन जायच आहे. तसेच जनावरांचा व थंडीचा धोका पण आहेच. पण सह्याद्रीच्या या अनएक्सप्लोर खजिन्यातून नक्कीच आमच्या हाती काहीतरी अद्भुत लागेल हे नक्की!”

अभिनेत्री सुरभी हिची प्रमुख भूमिका असलेला हा प्रोजेक्ट कोणता असेल याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना लागली आहे.

Web Title: Jai malhar serial actress surbhi hande marathi upcoming project can shooting start

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 06:39 PM

Topics:  

  • marathi actress
  • Television Actress

संबंधित बातम्या

Nupur Alankar : करिअर, कुटुंब सोडलं अन् अध्यात्माची वाट धरली; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री नुपुर अलंकार बनली संन्यासी
1

Nupur Alankar : करिअर, कुटुंब सोडलं अन् अध्यात्माची वाट धरली; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री नुपुर अलंकार बनली संन्यासी

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”
2

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
3

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.