बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम ( John Abraham) त्याच्या आगामी ‘वेदा’ (Vedaa)चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्रीसोबत शर्वरी वाघ आणि तमन्ना भाटिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. गेल्या अनेक दिवसापासून चाहते जॉनच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज मंगळवारी त्याच्या ‘वेदा’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे.
[read_also content=”मोठ्या पडद्यावर धमाल केल्यानंतर आता ओटीटीवर पाहता येणार ‘आर्टिकल 370’, ‘या’ दिवशी होणार रिलीज! https://www.navarashtra.com/latest-news/yami-gautam-starrer-article-370-is-all-set-to-release-on-a-digital-platform-soonn-nrps-516560.html”]
‘वेद’ चित्रपटात जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे, हे टीझरवरून स्पष्ट झालं आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना धोकादायक स्टंट आणि दमदार ॲक्शनचा संपूर्ण डोस मिळेल. जॉन अब्राहमने अधिकृत एक्स हँडलवर ‘वेदा’ चा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करताना जॉनने लिहिले की, ‘मला भांडता नाही येत, मला फक्त लढायचं कसं ते माहित आहे.’ जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ यांचा जबरदस्त अभिनय या चित्रपटात पाहायला मिळत आहे. शर्वरीही जॉनसोबत शत्रूंशी लढताना दिसत आहे.
‘वेदा’मध्ये जॉन अब्राहमसोबत शर्वरी वाघ, तमन्ना भाटिया आणि अभिषेक बॅनर्जी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 2019 च्या ॲक्शन थ्रिलर ‘बाटला हाऊस’ नंतर जॉन अब्राहम पुन्हा एकदा दिग्दर्शक निखिल अडवाणीसोबत एका चित्रपटात काम करत आहे. हा चित्रपट 12 जुलै रोजीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.