जुई गडकरी म्हणजे पुढचं पाऊल मधून घराघरात पोहचलेली कल्याणी सगळ्याच्या घरात पोहचलेली, जुई गडकरी हीने सगळ्याच्या मानवर राज्य केले, पण आता मध्यंतरी गंभीर आजारामुळे त्रस्त असल्याचं जुईने सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत सांगितलं होतं. एकापाठोपाठ एक आजार व शारीरिक त्रासामुळे जुई त्रस्त झाली होती. याबाबतच तिने आता भाष्य केलं आहे.
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिला तिच्या आजारपणाबाबत विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, माझ्यासाठी माझ्या आजारपणाचा काळ हा खूप जास्तच कठीण होता. खूप वर्ष माझं आजारपण सुरू होतं. कालांतराने आजर वाढत गेला. लॉकडाउनचा काळ हा सगळ्यांसाठी खूप निराशाजनक होता.
पण लॉकडाउन माझ्यासाठी खूप चांगला गेला. कारण ती दोन वर्ष मी स्वतःसाठी दिली. आपल्याला रडत बसायचं नाही हे माझ ठरलेलं होतं. कारण माझा मुळ स्वभाव रडत बसण्याचा, निराश होण्याचा किंवा हार मानण्याचा नाही. माझी जीवनशैली मी बदलली. डाएट केलं. रडत न बसता कोणाचा आधार न घेता उभं राहायचं हे मी पक्क केलं. माझ्या त्रासामुळे मी जिथे कुठे जाईन त्याची समोरच्याला जाणीवही होता कामा नये त्याप्रमाणे मी स्वतःला तयार केलं. त्यामुळेच आज मी सकारात्मक पद्धतीने काम करत आहे.” जुई आता नव्या जोमाने सगळ्या आजारांवर मात करत कामाला सुरुवात करत आहे.