Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेट सोडून नवरा होण्याच्या तयारीत के एल राहुल, अथिया शेट्टीने तर जेवणच सोडले

के एल राहुल त्याच्या लग्नाच्या तयारीत मग्न आहे. लग्नात (k L Rahul And Athiya Shetty Wedding) अधिक सुंदर दिसण्यासाठी ३० वर्षीय अथिया स्पेशल डाएट घेतेय. या क्यूट कपलचा विवाह सोहळा २१ ते २३ जानेवारीच्या दरम्यान खंडाळ्यात सुनील शेट्टीच्या हवेलीत होणार आहे.

  • By साधना
Updated On: Jan 05, 2023 | 01:19 PM
k l rahul and athiya shetty wedding

k l rahul and athiya shetty wedding

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: टीम इंडियाचा हॅन्डसम कॅप्टन के एल राहुल (K L Rahul) सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. सध्या के एल राहुल त्याच्या लग्नाच्या तयारीत मग्न आहे. त्याची होणारी बायको अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) सध्या स्ट्रिक्ट डाएटवर काम करतेय. अथियाने आपल्या इन्स्टावर नुकत्याच दोन स्टोरीज शेअर केल्यात, त्यात ती सुंदर दिसतेय. लग्नात (k L Rahul And Athiya Shetty Wedding) अधिक सुंदर दिसण्यासाठी ३० वर्षीय अथिया स्पेशल डाएट घेतेय. या क्यूट कपलचा विवाह सोहळा २१ ते २३ जानेवारीच्या दरम्यान खंडाळ्यात सुनील शेट्टीच्या हवेलीत होणार आहे.

अथिया लिक्विड डाएटवर
अथिया खरंतर रोज जीमला जाते. मात्र परफेक्ट शेपमध्ये दिसण्यासाठी ती कठोर डाएट फॉलो करतेय. आपल्या आयुष्यातल्या खास दिवशी परफेक्ट दिसण्यासाठी तिनं अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफकडून प्रेरणा घेतली आहे. बॉलिवूडच्या या तिन्ही अभिनेत्री लग्नाआधी कठीण फूड डाएट फॉलो करत होत्या आणि जंक फूडपासूनही लांबच होत्या. अथियाही आपल्या डाएटमध्ये पातळ पदार्थ आणि भाज्यांचं सेवन करत आहे.

खंडाळ्यात विवाहसोहळा
अथिया लग्नाच्या दिवशी लेहंगा घालणार आहे. या लेहंग्याच्या जवळ जाणारा रंगाचा ड्रेसच राहुलही परिधान करेल. अथियाचा ड्रेस मनिष मल्होत्राने डिझाईन केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र राहुलचा ड्रेस कोण डिझाईन करणार आहे हे कळू शकलेलं नाही. या कपलनं आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींच्या २१ ते २३ जानेवारी या तारखा बुक केलेल्या आहेत.

[read_also content=”आर्थिक मंदीची झळ – अमेझॉनची सगळ्यात मोठी नोकर कपात, ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड https://www.navarashtra.com/world/amazon-to-lay-off-over-18000-employees-due-to-uncertain-economy-nrsr-359401/”]

तीन वर्षांपासून डेटिंग
केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आधी ते  डिसेंबर महिन्यात  लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. तसेच दोघेही साऊथ इंडियन असल्यामुळे त्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाट साउथ इंडियन पद्धतीने पार पडणार असल्याच्या चर्चादेखील रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अथियाचे वडील अभिनेता सुनील शेट्टी यांना अथिया आणि राहुल लग्न कधी करणार ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी ते लवकरच लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं.

Web Title: K l rahul and actress athiya shetty to get married between 21 to 23 january nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2023 | 01:07 PM

Topics:  

  • athiya shetty
  • k l rahul

संबंधित बातम्या

शतक झळकावल्यानंतर KL Rahul साठी पत्नीने केली खास पोस्ट! केला प्रेमाचा वर्षाव
1

शतक झळकावल्यानंतर KL Rahul साठी पत्नीने केली खास पोस्ट! केला प्रेमाचा वर्षाव

आई झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉलिवूडला ठोकला रामराम, सुपरस्टारने केला खुलासा
2

आई झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉलिवूडला ठोकला रामराम, सुपरस्टारने केला खुलासा

Athiya Shetty आणि KL Rahul ने शेअर केला मुलीचा पहिला फोटो, नावही केलं जाहीर; अर्थही आहे खास
3

Athiya Shetty आणि KL Rahul ने शेअर केला मुलीचा पहिला फोटो, नावही केलं जाहीर; अर्थही आहे खास

IPL च्या सुरुवातीलाच के. एल. राहुलच्या घरी ‘गुड न्यूज’; अथिया शेट्टीने दिला गोंडस मुलीला जन्म
4

IPL च्या सुरुवातीलाच के. एल. राहुलच्या घरी ‘गुड न्यूज’; अथिया शेट्टीने दिला गोंडस मुलीला जन्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.