‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Crorepati) या कार्यक्रमाचे नवे पर्व नुकतेच सुरू झाले आहे. कोण होणार करोडपती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच विशेष भागात पहिल्यांदाच काजोल (Kajol) आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा (Tanuja) लावणार हजेरी लावणार आहे. एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर’ (ADAPT) या संस्थेसाठी त्या ‘कोण होणार करोडपती’ हा खेळ खेळणार आहेत.
[read_also content=”वजनदार ड्रेस घालणं उर्वशी रौतेलाला पडलं महागात, शरीरावर झाल्या जखमा https://www.navarashtra.com/photos/urvashi-rautela-photos-of-45-lakh-rupees-dress-nrsr-289727.html”]
‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या शनिवारच्या पहिल्याच विशेष भागात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, प्रसिद्ध अभिनेत्री काजोल या दोघी सहभागी होणार आहेत. या भागात मायलेकींचे हळुवार बंध, काजोलच्या नावाची गंमत, काजोलच्या लहानपणीचे किस्से अशा अनेक किश्शांचा उलगडा या भागात सचिन खेडेकर यांच्याशी संवाद साधताना दिसणार आहे. तनुजा आणि काजोल यांच्याबरोबर काजोलचा मित्र लेखक, दिग्दर्शक निरंजन अय्यंगार आणि तनुजा यांची मैत्रीण ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकरदेखील या भागात उपस्थित असणार आहेत.
[read_also content=”‘आश्रम 3’ रिलीज होताच ईशा गुप्ता झाली अधिक बोल्ड, शेअर केला बिकिनी फोटो https://www.navarashtra.com/movies/as-soon-as-ashram-3-was-released-esha-gupta-became-more-bold-shared-a-bikini-photo-289684.html”]