पाणीपुरी म्हटलं की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. पाणीपुरी खाताना आपलं भान हरपून जातं पण असचं काहीसं घडलयं अभिनेत्री काम्या पंजाबी सोबत. काम्या इंदूनला एका स्टॉलवर पाणीपुरी खायला गेली आणि एक लाख रुपय असलेला लिफाफा विसरली.
जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट विसरता तेव्हा तुम्हाला ती गोष्ट परत मिळेल अशी आशा नसते. आणि त्यात जर काही मौल्यवान वस्तू असेल तर ती परत मिळण्याची शक्यता खूप कमी होते. पण काम्याला तिचे पैसे परत मिळाले आहे. स्वतः याबाबत तिने माहिती दिली. काम्याने सांगितले की, ती रविवारी एका कार्यक्रमासाठी इंदोरमध्ये होती. दिग्दर्शक मित्र संतोष गुप्ता यांनी तिला प्रसिद्ध पाणीपुरी वाले छप्पनबद्दल सांगितले. इंदोर हे चाट पकोडांसाठी प्रसिद्ध शहर आहे. काम्यानेही छप्पनमध्ये जाऊन पाणीपुरी खाण्याचा निर्णय घेतला. काम्याने सांगितले की, माझ्याकडे एक लाख रुपयांचा लिफाफा होता जो मी काउंटरवर बाजूला ठेवला होता. पाणीपुरी खाण्यात आणि फोटो काढण्यात आम्ही इतके मग्न झालो की तिथला लिफाफा विसरून हॉटेलवर परत आलो. माझा मॅनेजर परत त्या दुकानात गेले, मी टेन्शनमध्ये होतो आणि मला माझे पैसे परत मिळतील की या आशेवर होते कारण ती ती जागा खूप गर्दीची होती. माझे मॅनेजर तिथे पोहोचले तेव्हा त्यांना माझे पॅकेट मी जिथे ठेवले होते तिथे सापडले, त्यांनी पाणीपुरी स्टॉलचे मालक दिनेश गुर्जर यांच्याशी बोलून ते परत घेतले.