ridhima kapoor (फोटो सौजन्य: social media)
कपूर कुटुंबातील अनेक कलाकार आहेत जे इंडस्ट्रीचे सुपरस्टार राहिले आहेत. आता कपूर घराण्यातील आणखी एक लेक वयाच्या ४४ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. चित्रपटाचे शुटिंगही आता पूर्ण झाले ती तिच्या चित्रपटासाठी फारच उत्सुक देखील आहे. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या बद्दलची माहिती दिली आहे.
आता खेळ सुरू…! करण जोहरच्या नव्या कोऱ्या ‘The Traitors’ चा ट्रेलर लाँच, उघडली अनेक गुपिते
पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये प्रदर्शन करणाऱ्या कपूर घराण्यातील लेकीचं नाव रिद्धिमा साहनी कपूर. रिद्धिमा ही ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी आणि रणबीर कपूरची बहीण आहे. तिने आधी ओटीटीवर पदार्पण केलं आता ती चित्रपटांमध्ये प्रवेश करतेय.
रिद्धिमा कपूर साहनी ‘डीकेएस’ नावाच्या आगामी ड्रामा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण लवकरच करणार आहे. आता, शिमला येथील माशोबर येथे ५२ दिवसांच्या दीर्घ वेळापत्रकानंतर या चित्रपटाचे शुटींग अखेर संपले आहे. रिद्धिमाने इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या सेटवरून एक फोटो शेअर केला ज्यामध्ये तिची आई नीतू, अभिनेत्री सादिया खतीब, सरथ कुमार, अदिती मित्तल आणि इतर कलाकारही दिसत आहे.
पोस्टमध्ये काय?
हा फोटो शेअर करतांना कॅप्शनमध्ये तिने लिहिले, परिवार. रिद्धिमा कपूरने तिच्या पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करताना एक हृदयस्पर्शी पोस्ट देखील शेअर केली आहे. तिने पोस्ट शेअर करत लिहिले आहे, “पहिलं हे नेहमीच खास असतं, कारण तेच ‘पहिले’ असतं जे आपण आयुष्यभर शिकत राहू. 52 दिवसांपर्यंत, 200 हून अधिक लोक या हृदयस्पर्शी, मजेदार आणि सुंदर चित्रपटाचे वर्णन करण्यासाठी एकत्र आले. आम्ही कथानक रचले, आम्ही नाचलो, आम्ही हसलो-रडलो आणि जेव्हा हा चित्रपट तुमच्या स्क्रीनवर येईल तेव्हा तुम्हीही या उत्सवात सामील व्हाल. आता या क्षणाची मी जास्त वाट पाहू शकत नाही #DKS.”
रिद्धिमासोबत सह-अभिनेत्याने केली पोस्ट शेअर
रिद्धिमाचा सह-अभिनेता आणि बालकलाकार, विधान शर्माने रिद्धिमासोबत एक गोंडस फोटो शेअर केला आहे. त्यात त्याने लिहिले आहे की “हा सुंदर प्रवास संपत असताना, आम्ही शेअर केलेले सर्व अद्भुत क्षण, आम्ही हसलेले विनोद, आम्ही एकत्र खेळलेले सजग खेळ, कोणीही नसताना तुम्ही दिलेलं प्रेम मला आठवतं. आमच्या वेळेपेक्षा फक्त एकच गोष्ट मौल्यवान आहे आणि ती म्हणजे आपण तो वेळ कुठे घालवतो आणि मी तो तुमच्यासोबत तो वेळ घालवला याचा मला आनंद आहे. रिद्धिमा मॅडम, तुमच्यावर नेहमीच प्रेम आहे. तुमच्याकडून खूप काही शिकलो आणि तुम्ही निःस्वार्थपणे जे काही दिले ते माझ्या हृदयात कायमचे कोरले जाईल.” असं म्हणत त्याने रिद्धिमाचं प्रेमाने कौतुक केलं आहे. त्याच्याशिवाय, बाल कलाकार स्वर्णा पांडेनेही रिद्धिमासोबतचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये 44 वर्षीय रिद्धिमा तिला मिठी मारताना दिसत आहे.
अद्याप चित्रपटाची तारीख जाहीर नाही
एका वृत्तानुसार, हा चित्रपट आशिष आर मोहन दिग्दर्शित करत आहेत, त्यांनी ‘खिलाडी 786’ आणि ‘वेलकम टू कराची’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात रिद्धिमासह नीतू कपूर आणि कपिल शर्मा देखील मुख्य भूमिकेत आहेत. निर्मात्यांनी चित्रपटाचे अधिकृत शीर्षक आणि प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही आहे.