Actress Revathi Iyyer Paayvaatachi Savali In This Marathi Movie Charcter Play Lead Role
प्रसिद्ध रिॲलिटी शो “चल भावा सिटीत” या कार्यक्रमात अभिनेत्री रेवथी अय्यरने सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमामध्ये रेवथी लाईमलाइटमध्ये दिसत आहे. तसेच तीने घेतलेल्या मेहनतीमुळे ती महाअंतिम सोहळ्यात देखील पोहोचली आहे. ती आता लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तिची मुख्य भुमिका असणारा ‘पायवाटाची सावली’ हा चित्रपट ३० मे रोजी अर्थात आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे तिचे चाहते या चित्रपटासाठी फारच उत्सुक आहेत. सध्या सोशल मीडियावर रेवथीच्या चित्रपटाची चर्चा आहे.
नेहा पेंडसेच्या दागिन्यांची कान्समध्ये चर्चा, अभिनेत्रीच्या लूकने सौंदर्यात घातली अधिक भर
मराठी चित्रपट त्याच्या आशयघन, दर्जेदार आणि दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपला ठसा चांगलाच उमटवला आहे. अशाच सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा आणि माणसाच्या भावनिक संघर्षाचा वेध घेणारा ‘पायवाटाची सावली’ हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट ३० मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘मीना शमीम फिल्म्स’ प्रस्तुत ‘पायवाटाची सावली’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि लिखाणाची जबाबदारी मुन्नावर शमीम भगत यांनी सांभाळली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू ‘मीना शमीम फिल्म्स’ने सांभाळली आहे. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत अमित अनिल बिस्वास यांनी केले आहे. या चित्रपटात विजे भाटिया, शाल्वी शाह, रेवती अय्यर, प्रसाद माळी आणि शीतल भोसले हे कलाकार आहेत. तर समीर सक्सेना यांनी एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर आणि सिंडीकेशनचे काम केले आहे. चित्रपटाच्या वितरनाची जबाबदारी संस्थापक चंद्रकांत विसपुते आणि अकात डिस्ट्रीब्यूशनकडे आहे.
इंदूच्या गोंधळलेल्या मनाच्या मदतीसाठी विठू पंढरपूरकरची एन्ट्री, मालिकेत कोणतं वळण येणार ?
अभिनेत्री रेवथी अय्यर “पायवाटाची सावली” या चित्रपटाच्या अनुभवाविषयी सांगते, “प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, निर्माते मुन्नावर शमीम भगत सरांनी जेव्हा मला या चित्रपटाविषयी विचारलं तेव्हा मला फार आनंद झाला होता. मी या आधी काही हिंदी मालिकांमध्ये काम केल आहे. चित्रपटात काम करण्याची माझी खूप आधीपासून इच्छा होती. ही इच्छा एतक्या लवकर पूर्ण होईल अस मला स्वप्नात देखील वाटल नव्हत. मी लगेच या चित्रपटासाठी माझा होकार कळवला. पहिलाच चित्रपट शिवाय प्रमुख भूमिका मिळाली त्यामुळे माझा आनंद गगनात मावत नव्हता. चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण हे कोल्हापुरातील एका गावात शूट झालं आहे. या चित्रपटामुळे मी खूप नव्या गोष्टी शिकले. मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे मी मुन्नावर सर यांचे मनापासून आभार मानते. माझी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी पायवाटाची सावली हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की बघावा.”
अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित
चित्रपटाचे वितरक अकात डिस्ट्रीब्यूशनचे संस्थापक चंद्रकांत विसपुते चित्रपटाविषयी सांगते, “अकात डिस्ट्रीब्यूशन येत्या ३० तारखेला पायवाटाची सावली या सिनेमाचे वितरण करत आहे पायवाटाची सावली या सिनेमाचे एक विशिष्ट वैशिष्ट्य आहे हा भावनिक सिनेमा असून समाजाला दिशा दाखवणारा तसेच इच्छाशक्तीला मानणारा मोटिवेशनल सिनेमा आहे सध्या जे सिनेमे आपल्याकडे येत आहेत त्याच्यापेक्षा वेगळा आणि उत्कृष्ट स्टोरी लाईन असलेला पायवाटची सावली या सिनेमांमध्ये अमित विश्वास जे अनिल विश्वास ज्येष्ठ संगीतकार यांचे सुपुत्र आहेत त्यांनी प्रथमच मराठीत अतिशय सुंदर म्युझिक केला आहे मुनावर शमीन यांनी दिग्दर्शन तसेच निर्माते ही तेच आहेत हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशा प्रकारचा आहे साधारण पहिल्या वीक मध्ये 50 सिनेमागृहांमध्ये हा रिलीज होत आहे.”