अबब! करण जोहरची संपत्ती पाहून डोळेच गरगरतील; 'असा' आहे राजेशाही थाट
चित्रपट निर्माता करण जोहर बॉलिवूड इंडस्ट्रीतील यशस्वी सेलिब्रिटींपैकी एक आहे. त्याने अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात आपलं नाव उज्वल केलं आहे. जरीही करण अभिनय क्षेत्रात फ्लॉप ठरला असला तरीही तो दिग्दर्शन आणि निर्मितीमध्ये सुपर डुपर हिट ठरला आहे. करण जोहरचा जन्म २५ मे १९७२ रोजी झाला असून तो चित्रपट निर्माते यश जोहर आणि हिरू जोहर यांचा मुलगा आहे.
ज्येष्ठ कवी गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान
गेल्या २६ वर्षांपासून तो बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असून सुपरहिट चित्रपट देत तो बॉलिवूड इंडस्ट्रीवर करत आहे. करणने HR कॉलेज ऑफ कम्युनिकेशन अँड इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. तर, करणने ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २०१५ मध्ये तो अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटातही काम करताना दिसला होता. तर त्याने स्वत:चा ‘कॉफी विथ करण’ नावाच्या चॅट शोमधून सूत्रसंचालन करताना देखील दिसतो. कायमच आपल्या चित्रपटामुळे चर्चेत राहणाऱ्या करणच्या फिल्मी करियरवर एक नजर टाकूया…
करण जोहरने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. १९९५ साली रिलीज झालेल्या आदित्य चोप्राच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातून त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. यानंतर, १९९८ मध्ये करणने दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश केला. १९९८ मध्ये रिलीज झालेल्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्याने केले होते. या चित्रपटात शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल देवगण मुख्य भूमिकेत होते. तर, सलमान खानने (कॅमियो) केले होते. करणचा तो पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.
यानंतर २००१ मध्ये करणचा ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपटही ब्लॉकबस्टर हिट ठरला. यानंतर, तिसरा चित्रपट ‘कल हो ना हो’ देखील हिट झाला. करणने इंडस्ट्रीत प्रवेश करताच खळबळ उडवून दिली होती. त्याच्या फॅमिली एंटरटेनर चित्रपटांनी चाहत्यांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले. करणने हळूहळू दिग्दर्शनासोबत निर्मितीमध्येही हात आजमावला. करण बहुतेक चित्रपटांची निर्मिती देखील करतो. तो बॉलिवूडमधील यशस्वी निर्मात्यांपैकी एक आहे.
करणच्या हिट चित्रपटांमध्ये (दिग्दर्शन-निर्मिती) ‘कभी अलविदा ना कहना’, ‘स्टुडंट ऑफ द इयर’, ‘माय नेम इज खान’, ‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी’, ‘शेरशाह’, ‘दोस्ताना’, ‘अग्निपथ’, ‘ब्रह्मास्त्र’, राझी’ या चित्रपटांचा समावेश आहे. २०२३ साली रिलीज झालेल्या आलिया भट्ट आणि रणवीर सिंग स्टारर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्याच्या ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. करण जोहरने निर्मित केलेला शेवटचा चित्रपट ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपट आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.
करणच्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे तर, मीडिया रिपोर्टनुसार, करणच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाने सुमारे ६५ कोटींची कमाई केली होती. ‘कभी खुशी कभी गम’ने ७७.२९ कोटींचा व्यवसाय केला. ‘कभी अलविदा ना कहना’ चित्रपटाने ६१.६८ कोटींची कमाई केली होती. ‘माय नेम इज खान’ने ११४ कोटी रुपये कमावले होते. तर ‘स्टुडंट ऑफ द इयर’ने ९७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाने १५६ कोटी रुपये कमावले होते. तर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ने १५३ कोटी रुपये कमवले होते.
करण जोहरने अनेक स्टार्सना लाँच केले आहे. या यादीत पहिले नाव सुपरहिट अभिनेत्री आलिया भट्टचे आहे. याशिवाय वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, दिग्दर्शक शशांक खेतान, अनन्या पांडे, तारा सुतारिया, दिग्दर्शक शकुन बत्रा, जान्हवी कपूर यांसारख्या स्टार्सनाही त्याने लॉन्च केले. करण जोहर जितका त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो तितकाच तो त्याच्या फॅशन स्टेटमेंटमुळेही चर्चेत असतो. करणच्या फॅशन सेन्सची कायमच जोरदार चर्चा होते. त्याच्याकडे मोठ्या ब्रँडचे कपडे आणि अॅक्सेसरीजही आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मेट गालामध्येही एक खास लूक केलेला होता. त्याच्या लूकचीही चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा झाली होती.
वर्षानुवर्षे चालणाऱ्या ‘बिग बॉस’मध्ये होणार मोठा बदल, शो आता १०० दिवस नाही तर ‘इतके’ महिना चालणार
याशिवाय, करणला प्रवासाचीही खूप आवड आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, करण जोहरला न्यूयॉर्क सिटीमध्ये फिरायला खूप आवडते. करण जोहर अनेकदा लंडनमध्ये त्याचा क्वालिटी टाईम स्पेंड करत असतो. निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा भारतातील सर्वात श्रीमंत चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्याच्याकडे १७०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तो एका जाहिरातीसाठी २ कोटी रुपये घेतो. याशिवाय, तो त्याच्या चॅट शो कॉफी विथ करणच्या एका एपिसोडसाठी १ ते २ कोटी रुपये घेतो. मुंबईत त्यांचे ३२ कोटी रुपयांचे घरही आहे. दरम्यान, करणच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं तर, करण जोहर विवाहित नाही. करण जोहरने २०१७ मध्ये सरोगसीद्वारे रुही आणि यश अशा जुळ्या मुलांचा बाप झाला होता. करण त्याच्या मुलांसोबत आणि आईसोबत मुंबईत राहतो.