करीना कपूरच्या मनात अजूनही 'ती' भिती कायम; म्हणाली, "मुलांनी ती घटना इतक्या लहान वयात…"
जानेवारी महिन्यामध्ये सैफ अली खानवर एका अज्ञात व्यक्तीकडून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात अभिनेता जखमी झाला होता. या हल्ल्यात त्याच्या पाठीत चाकूचं टोक घुसलं होते. शस्त्रक्रिया करुन पाठीत घुसलेलं चाकूचं टोक काढण्यात आलं. या हल्ल्यामुळे अख्खा देश हादरला होता. या हल्ल्यातून आता खान कुटुंबीय सावरताना दिसत आहे. नुकतंच करीनाने एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीत अभिनेत्रीने आपलं मत स्पष्ट केलं आहे. त्या भ्याड हल्ल्याचा आपल्या लहान मुलांवर कसा परिणाम झाला होता ? या प्रश्नाचं उत्तर अभिनेत्रीने एका मुलाखतीत दिले आहे.
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर सुयश राय यांची पोस्ट, अभिनेता काय म्हणाला ?
बरखा दत्ता हिला दिलेल्या मुलाखतीत करीना कपूरने सांगितले की, “अजूनही त्या घटनेचा मनात विचार आला तरी मन घाबरं होतं. मी अजूनही त्या गोष्टीतून सावरत आहे. आपल्या मुलांच्या खोलीमध्ये मध्यरात्री कोणीतरी शिरलंय, या गोष्टीचा जरी विचार आला तरी मला फार भिती वाटते. सहसा अशा घटना आपल्याला केव्हाही मुंबई ऐकू येत नाहीत. मुंबईमध्ये आम्ही केव्हाही कोणीतरी घरात घुसून आपल्या पतीवर हल्ला करतं, अशी घटना केव्हाही ऐकलेली नाही. पण अमेरिकेमध्ये या घटना फार सामान्य आहे. अमेरिकेतल्या सेलिब्रिटींच्या घरामध्ये घुसून चोरीच्या घटना घडल्याच्या बातम्या आपण ऐकलं असेल.”
‘लोकांना श्रीदेवी मूर्ख वाटली…’, पूनम ढिल्लोनचा धक्कादायक खुलासा; सांगितला एक किस्सा
मुलाखती दरम्यान पुढे अभिनेत्री म्हणाली की, “सुरुवातीचे महिने मी खूप अस्वस्थ होते. मला झोप पण नव्हती यायची, मला नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी बराच वेळ लागला, तरीही आजही मी कधीकधी चिंताग्रस्त असते. घटनेनंतर करीनाला तैमूर आणि जेहसाठी खंबीर राहावं लागलं. त्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, “मला माझ्या मुलांसाठी कायम भीतीयुक्त वातावरणात जगायचं नव्हतं. कारण त्या घटनेचा मुलांवर ताण टाकणंही चुकीचं आहे. त्यामुळे या घटनेनंतर माझा एक आई आणि एक पत्नी म्हणून कठीण प्रवास सुरू होता. पण, मी आनंदी आहे आणि कायमच देवाचे आभार मानते की, आम्ही सुरक्षित आहोत. आम्ही एक कुटुंब म्हणून कायमच खंबीर राहिलो.”
“जेह तर नेहमी म्हणतो की माझे वडील बॅटमॅन, आयर्न मॅन आहेत. कारण ते कोणालाही हरवू शकतात. त्याच्यासाठी सैफ हिरो आहे. आमच्या सर्वांसाठीच सैफ आयर्न मॅन आहे. माझ्या मुलांना त्यांच्या इतक्या सुरक्षित आयुष्यातही अशा हल्ल्याच्या घटनांना सामोरे जावं लागत आहे. घटनेनंतर माझ्या दोन्हीही मुलांना वास्तवाचं भान आलं आहे. कारण, एकाने वयाच्या चौथ्या वर्षी, तर दुसऱ्याने वयाच्या आठव्या वर्षी रक्त पाहिलंय. त्यांनी इतक्या लहान वयात हे सर्व पाहायला नको होतं. घटनेनंतर त्याच्या आठवणी कितीही पुसट होत गेल्या तरीही काही आठवणी मनाच्या कोपऱ्यात कुठे ना कुठे कोरल्या जातात. हे मृत्यूसारखं आहे, जेव्हा तुम्ही कोणाला गमावता तेव्हा तुम्ही त्यातून कधीच बाहेर पडत नाही. मी हे अनुभवलंय.”