(फोटो सौजन्य - x अकाउंट)
‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाने सर्वांचे मन जिंकणारा अभिनेता हर्षवर्धन राणे आता एका उत्तम चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे पोस्टर आणि शीर्षक समोर आले आहे. अलीकडेच, अभिनेता या आगामी चित्रपटाची तयारी करताना दिसला. हा चित्रपट कोणता आहे आणि कधी प्रदर्शित होणार हे आपण आता जाणून घेणार आहोत.
चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित
हर्षवर्धन राणे याच्या आगामी चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्याने तो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्यासोबत सादिया खतीब दिसत आहे, ज्यामध्ये अभिनेता सादियाला घट्ट धरून आहे. यासोबतच, दोघेही जखमी अवस्थेत दिसून येत आहेत, ज्यामध्ये ते रक्ताने माखलेले दिसत आहेत. हे पोस्टर प्रदर्शित करताना, चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक देखील जाहीर केले आहे. या चित्रपटाचे नाव ‘सिला’ आहे.
‘अलग हूं पर कमजोर नहीं…’, तगडी स्टारकास्ट असलेला अनुपम खेर यांचा ‘Tanvi The Great’ चा ट्रेलर रिलीज
‘सिला’ चित्रपटाबद्दल
हर्षवर्धन राणे आणि सादिया खतीब यांचा आगामी ‘सिला’ हा चित्रपट ओमंग कुमार दिग्दर्शित करत आहेत. याशिवाय, या चित्रपटात करणवीर मेहरा नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उद्यापासून म्हणजेच १ जुलैपासून सुरू होत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नेटकरी या चित्रपटाचे पोस्टर पाहून हा चित्रपट ब्लॉकब्लस्टर ठरेल असे म्हणत आहे.
हर्षवर्धन राणेचे आगामी चित्रपट
हर्षवर्धन राणे यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो ‘एक दिवाने की दिवानियात’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेता सोनम बाजवा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.