(फोटो सौजन्य - x अकाउंट)
पूनम ढिल्लोन ही बॉलीवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीने ७० च्या दशकात अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केला आणि अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. अलीकडेच पूनमने सांगितले की पूर्वीच्या अभिनेत्री सेटवर आणि बाहेर कशा वागायच्या. तसेच अभिनेत्रीने श्रीदेवीबद्दलही आपले मत मांडले आहे. पूनम ढिल्लोन दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबद्दल काय म्हणाल्या आहेत आपण जाणून घेऊयात.
अभिनेत्री मूर्ख असल्याचे भासवत असत
एएनआयशी बोलताना पूनम म्हणालीकी, पूर्वीच्या अभिनेत्री गोऱ्या आणि मूर्ख मुली असल्यासारखे वागायच्या. त्यांना काहीही समजत नाही. पूनम म्हणाली, ‘असे दोन कारणांमुळे घडायचे. कधीकधी सेटवर न पटणारे विनोद सांगितले जात असत तर ती बसून त्यांच्यावर हसत नसे. अभिनेत्री फक्त असे भासवत असे की त्यांना हा विनोद समजलाच नाही. जेणेकरून लोकांशी काही अंतर राखता येईल. कारण अभिनेत्यांना वाटायचे की अभिनेत्रीला विनोद सांगायला सुरुवात केली, त्यांना असे वाटायचे की हे अभिनेत्री त्यांच्याकडून काही अपेक्षा करतील. म्हणून वर्षानुवर्षे मूर्ख राहणे चांगले.’
‘श्रीदेवी मूर्ख नव्हती’ – पूनम ढिल्लोन
अभिनेत्रीने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीबद्दल सांगितले की लोक कसे त्यांच्याबद्दल चुकीचे अंदाज लावत होते. ती म्हणाली, “श्रीदेवी एक अतिशय हुशार अभिनेत्री होती. जर ती मूर्ख असती तर ती इतकी हुशार नसती. लोक तिला मूर्ख म्हणायचे. मी म्हणते की ती एक खूप हुशार आणि तीक्ष्ण मुलगी होती. जर ती मूर्ख असती तर ती इतकी हुशार अभिनेत्री कशी झाली असती? मी यावर विश्वास ठेवत नाही.”
‘अलग हूं पर कमजोर नहीं…’, तगडी स्टारकास्ट असलेला अनुपम खेर यांचा ‘Tanvi The Great’ चा ट्रेलर रिलीज
पूनमने श्रीदेवीचे कौतुक केले
पूनमने “सोने पे सुहागा” आणि “जुदाई” सारख्या चित्रपटांमध्ये श्रीदेवीसोबत काम केले. दिवंगत स्टारसोबत काम करण्याच्या तिच्या अनुभवाबद्दल बोलताना पूनम म्हणाली, “मी नेहमीच तिच्या कामाचे कौतुक केले आहे. मी तिच्यासोबत काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती एक शांत व्यक्ती होती.” असे अभिनेत्री म्हणाली. श्रीदेवीचे २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईमध्ये निधन झाले. अभिनेत्याच्या जाण्याने इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली.