Bhool Bhulaiyaa 3 रुह बाबा आणि मंजुलिका यांच्यातील लढत कोणत्या ओटीटीवर दिसणार ?
कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी स्टारर ‘भुल भुलैय्या ३’ची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या ‘भुल भुलैय्या ३’ने चार दिवसांत १२३. ५० कोटींची कमाई केलेली आहे. दुसऱ्या दिवसापासून चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. आता अशातच चित्रपट किती कमाई करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरत असून अभिनेता कार्तिक आर्यनने दिलेल्या हिंटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. अभिनेत्याने चित्रपटाच्या चौथ्या भागाचीही चाहत्यांना हिंट दिली आहे.
अलीकडेच, कार्तिक आर्यनने थिएटरमध्ये पोहोचून चाहत्यांना सरप्राईज दिले. या दरम्यानचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावेळी कार्तिकसोबत चित्रपटाचे निर्माते भूषण कुमारही होते. त्यांनी Gaiety Galaxy Theatre मधील प्रेक्षकांना भेट दिली. यावेळी तिथे Housefull चा बोर्डही दिसला. थिएटर व्हिझिट दरम्यानचा व्हिडिओ कार्तिकने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. व्हिडिओमध्ये चाहत्यांची ही एकच गर्दी पाहायला मिळतेय. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने ‘भुल भुलैय्या ४’ ची हिंट चाहत्यांना दिली आहे.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कार्तिक म्हणतो, “नवीन हवेलीचा दरवाजा उघडण्याची वेळ झाली आहे…” या व्हिडिओच्या कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये ‘भुल भुलैय्या ४’ची जोरदार चर्चा होत आहे. कार्तिक आर्यनच्या कॅप्शनच्या आधारे चौथा भाग येऊ शकतो, असे बोलले जात आहे. पण निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या फ्रेंचायझीबद्दल माहिती दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी ‘भुल भुलैय्या ४’च्या स्क्रिप्टवरही काम करायला सुरूवात केली आहे. खरं तसं पाहिलं तर, ‘भुल भुलैय्या ३’मध्ये निर्मात्यांनी कोणत्याही क्लायमेक्सची हिंट प्रेक्षकांना दिलेली नाही. त्यामुळे ‘भुल भुलैय्या ४’ मध्ये काय दिसणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
भूषण कुमार निर्मित ‘भुल भुलैय्या ३’ मध्ये कार्तिक आर्यन रूह बाबा म्हणून परतला आहे. ‘भुल भुलैय्या’ची फ्रँचायझी कार्तिक आर्यनसाठी खूप लकी ठरली आहे. कार्तिक आर्यनच्या फिल्मी करियरमध्ये, सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये या ‘भुल भुलैय्या २’ आणि ‘भुल भुलैय्या ३’चा समावेश झाला आहे. ‘भुल भुलैय्या ३’ चित्रपट लवकरच ‘भुल भुलैय्या २’ने केलेल्या कमाईचा आकडा मोडत स्वत:च्या नावावर नवा विक्रम करणार आहे.
चित्रपटात तृप्ती डिमरी, राजपाल यादव, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन मंजुलिका यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षकांना सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे सस्पेन्स. शेवटचा सस्पेन्स धक्कादायक आहे. आणि म्हणून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि चाहत्यांच्या पसंतीस हा चित्रपट पडला आहे.