(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘भूल भुलैया 3’मध्ये रुह बाबा आणि मंजुलिका म्हणजेच विद्या बालन यांच्यात जबरदस्त टक्कर पाहायला मिळत आहे. हा हॉरर कॉमेडी चित्रपट लोकांना खूप आवडला आहे. दरम्यान, कार्तिक आर्यनने एका मुलाखतीदरम्यान त्याच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला. तो म्हणाला की, सध्या तो सिंगल आहे. आणि अभिनेत्याने याचे कारण देखील स्पष्ट केले आहे.
कार्तिक आर्यनने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसवर सोडले मौन
अभिनेता कार्तिक आर्यनने अलीकडेच मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘मी सिंगल आहे आणि आता मला माझे लाइव्ह लोकेशन कोणालाही पाठवण्याची गरज नाही. मी आता माझ्या डेटिंग ॲप्सवर देखील उपस्थित नाही. तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाले तर, मी जेव्हा पासून चंदू चॅम्पियनची तयारी सुरू केली होती आणि त्यासाठी शूटिंग सुरू केले, तेव्हापासून माझ्याकडे वेळच नाही आहे.’ असे अभिनेत्याने सांगितले आहे. कार्तिक आर्यनचे नाव याआधी सारा अली खान, अनन्या पांडेसह अनेक अभिनेत्रींसह जोडले गेले होते. मात्र, ‘लव्ह आज कल’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर सारा आणि कार्तिकचे ब्रेकअप झाले. तर अनेकदा कार्तिकचे नाव वेगवेगळ्या अभिनेत्रींसह जोडण्यात आले होते. मात्र आता आपण पूर्णतः सिंगल असल्याचे कार्तिकने सांगितले आहे.
हे देखील वाचा – बॉलिवूडचा तो हिट चित्रपट ज्यात हिरो एकही डायलॉग बोलला नाही
विद्या बालनने एक इशारा दिला होता
अलीकडेच विद्या बालनने कार्तिक आर्यनला डेट करण्याचे संकेत दिले होते. अभिनेत्रीने द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये सांगितले होते की, ‘कार्तिक सेटवर फोनवर नेहमी व्यस्त असायचा आणि लव्ह यू वगैरे म्हणत असे’. हे ऐकून अभिनेता लाजू लागला. आणि अनेक महिला चाहत्यांचे हृदय तुटले. आता अभिनेता त्याच्या भूल भुलैया ३ चित्रपमुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 1 नोव्हेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने चार दिवसांत 120 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.
हे देखील वाचा – Bhool Bhulaiyaa 3 Box Office Day 4: ‘मंजुलिका’ने सोमवारच्या कसोटीत ‘सिंघम अगेन’ला दिली दमदार टक्कर!
भूल भुलैया ३ मधील कलाकार
भूषण कुमार निर्मित भूल भुलैया 3 मध्ये कार्तिक आर्यन रूह बाबा म्हणून परतला आहे. चित्रपटात तृप्ती डिमरी, राजपाल यादव, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन मंजुलिका यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षकांना सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे सस्पेन्स. शेवटचा सस्पेन्स धक्कादायक आहे. आणि म्हणून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि चाहत्यांच्या पसंतीस हा चित्रपट पडला आहे.