कियारा अडवाणीला तिच्या मुलीमध्ये हवेत करीना कपूरचे ‘हे’ ३ गुण, म्हणाली…
कियारा अडवाणी(Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपलपैकी एक आहे. त्यांनी ७ फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. काही दिवसांपूर्वीच या प्रसिद्ध सेलिब्रिटी कपलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत ते आई-वडील होणार असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर त्यांच्यावर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही शुभेच्छांचा वर्षाव केला होता. तेव्हापासून हे सेलिब्रिटी कपल कमालीचे चर्चेत आहेत. आता या सगळ्यात अभिनेत्री कियारा अडवाणीने एका कार्यक्रमात बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor Khan) खानबद्दल केलेले वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
प्रधानजींवर गोळी कोणी झाडली ? ‘पंचायत ४’ वेबसीरीज रिलीज केव्हा होणार ? समोर आली महत्वाची अपडेट
दरम्यान, कियाराचा एक जुना इंटरव्ह्यूचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये, कियारा म्हणते की, तिला मुलगी हवी आहे आणि त्या मुलीमध्ये करीना कपूर सारखे गुण हवे आहेत. तिच्यासारखे कोणते गुण हवे ? याचाही अभिनेत्रीने खुलासा केला आहे. करीना कपूर आणि कियारा अडवाणी स्टारर ‘गुड न्यूज’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावेळी कियाराने ‘बॉलिवूड हंगामा’ला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत कियाराला, “जर तुला जुळी मुलं (मग ते दोन मुलं किंवा दोन मुली किंवा एक मुलगा आणि एक मुलगी…) झाले तर ?” असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर कियाराने दिलेल्या उत्तराने सर्वच चाहत्यांचे तिने मन जिंकलेय.
मुलाखतीत दिलेल्या उत्तरामध्ये कियारा म्हणाली की, “जर देव मला उत्तम भेट देऊ शकला तर मला दोन्हीही निरोगी आणि सुदृढ बाळ हवे आहेत.” जेव्हा करीनाने यावर कियाराला चिडवले तेव्हा तिने सांगितले की तिला एक मुलगा आणि एक मुलगी हवी आहे. यानंतर कियाराला विचारण्यात आले की तुला तुझ्या मुलीमध्ये करीना कपूरमधील कोणती गुणवैशिष्ट्ये पाहायला आवडतील ? या प्रश्नावर उत्तर देताना कियारा म्हणाली, “करीनाचा आत्मविश्वास, तिचे एक्सप्रेशन्स (हावभाव) आणि प्रतिभा… हे तिच्यातले गुण मला माझ्या मुलीमध्ये हवे आहेत. करीनाला या तिन्ही गुणांसाठी मी तिला १० पैकी १० गुण देईन.”
कियारा अडवाणीने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर लहान बाळाच्या मोज्यांचा फोटो शेअर केला होता. ते मोजे कियारा आणि सिद्धार्थच्या तळहातात असल्याचे दिसले. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, “आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट. लवकरच येत आहे.” अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. फेब्रुवारी २०२३ मध्ये राजस्थानातील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या कपलने लग्न केले. या कपलने २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम केलेय. या चित्रपटातून कियारा- सिद्धार्थने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले होते.