Panchayat 4 Online Leak Netizens Say Masterclass Shared Free Download Link Streaming On Ott Platform Amazon Prime Video
वेबविश्वामध्ये लोकप्रिय सीरीज म्हणून ‘पंचायत’ वेबसीरीजचा समावेश केला जातो. या सीरीजने कोरोना काळात प्रेक्षकांचं घरबसल्या निखळ मनोरंजन केलं आहे. ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’वर रिलीज झालेल्या ह्या सीरीजचे आजपर्यंत तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच या सीरीजचा चौथा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाजलेल्या सीरीजला प्रेक्षकांकडून फक्त देशातच नाही तर परदेशातही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. तीनही सुपरहिट सीझननंतर प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती चौथ्या सीझनची… सध्या सोशल मीडियावर ‘पंचायत ४’च्या रिलीज डेटची जोरदार चर्चा सुरु आहे.
गेल्या ३ सीझनमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या ‘पंचायत’ वेबसीरीजचे निर्माते पुढील सीझनची तयारी करत आहेत. या सीरीजच्या चौथ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात देखील झाली आहे. दरम्यान, पंचायत ४ बद्दल नवीन अपडेट आली आहे. जी त्या सीरीजच्या रिलीज तारखेसंबंधित आहे. याशिवाय, ‘काला पाणी २’ या वेब सीरीजच्या रिलीज डेटबद्दलही महत्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या वर्षी मे २०२४ मध्ये, जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता आणि फैझल मलिक स्टारर असलेले ‘पंचायत’ सीरीजचा तिसरा सीझन रिलीज झाला होता. या वेबसीरीजला प्रेक्षक, समीक्षकांकडून आणि अनेक सेलिब्रिटींकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता, ज्यामुळे ही ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’वरील सर्वाधिक चर्चेत राहिलेली आणि तितकीच लोकप्रिय वेबसीरीज ठरली.
दरम्यान, ‘पंचायत’च्या तिसऱ्या सीझनमध्येच प्रेक्षकांना कळालं होतं की, या सीरीजचा चौथा सीझनही रिलीज होणार आहे. सीरीजच्या शेवटच्या एपिसोडमध्ये, काही शाब्दिक वादांमुळे काही गावगुंडांनी प्रधानजींवर गोळी झाडली होती. त्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना येत्या चौथ्या सीझनमध्ये मिळणार आहेत. प्रेक्षकांना ‘पंचायत ४’मध्ये, प्रधानजींवर गोळी कोणी झाडली ? सचिव आणि रिंकुचं लग्न होणार का? फुलेराचा नवीन प्रधान कोण होणार ? खरोखर सचिव फुलेरा गाव सोडून जातील का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चर्चा सुरु होती की, निर्मात्यांनी सीरीजच्या शूटिंगचं टाईमटेबल फायनल केले आहे. आता बातम्या येत आहेत की, निर्मात्यांनी ‘पंचायत ४’ची रिलीज डेटही ठरवली आहे.
बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणाऱ्या ‘फसक्लास दाभाडे’चे चित्रपटगृहात अर्धशतक; ओटीटीवरही तुफान प्रतिसाद
मिडिया रिपोर्टनुसार, ‘पंचायत’च्या निर्मात्यांनी सीरीजच्या चौथ्या सीझनची तारीख २०२५ या वर्षाच्या शेवटी किंवा २०२६ वर्षाच्या सुरुवातीला ‘पंचायत’चा चौथा सीझन रिलीज करण्याची शक्यता आहे. अद्याप, वेबसीरीजच्या निर्मात्यांकडून किंवा दिग्दर्शकांकडून रिलीज डेटबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ‘पंचायत ४’ची अधिकृत घोषणा ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’च करेल. इतर सीझनप्रमाणे त्याचा चौथा सीझन देखील प्रभावी असेल, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. पंचायत ४ व्यतिरिक्त, चाहते नेटफ्लिक्सची प्रसिद्ध वेबसीरिज ‘काला पानी’च्या सीझन २ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सीरीजच्या पहिल्या सीझनने अनेकांना खूप प्रभावित केले होते आणि आता ते या सीरीजच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. जर आपण त्याच्या रिलीज तारखेकडे पाहिले तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते २०२६ च्या सुरुवातीला रिलीज करण्याची शक्यता आहे.