Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…नाय त्यांना पळता भुई थोडी केली तर किरण माने नाव लावणार नाय’, किरण मानेंचा फेसबुक पोस्टद्वारे इशारा – उद्या पत्रकार परिषदेत उलगडणार अनेक गुपिते

किरण माने (Kiran Mane) ४ फेब्रुवारीला दुपारी साडे तीन वाजता ते मुंबई (Mumbai) प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद (Kiran Mane Press Conference) घेणार आहेत. त्याविषयीची एक सविस्तर फेसबुक पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

  • By साधना
Updated On: Feb 03, 2022 | 04:19 PM
kiran mane

kiran mane

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील मुलगी झाली हो (Mulgi Zali Ho) या मालिकेतून काढून टाकल्यानंतर प्रोडक्शन हाऊस, मालिकेतील कलाकार, ट्रोलर, नेतेमंडळी यांच्या अनेक प्रतिक्रिया येत होत्या. मालिकेतील काही कलाकारांनी त्यांच्यावर गैरवर्तनाचा ठपका ठेवला होता. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा मानस किरण माने यांनी बोलून दाखवला होता. आज एक फेसबुक पोस्ट (Kiran Mane Facebook Post)  करुन नव्या लढ्याची घोषणाच किरण माने यांनी केली आहे.

किरण माने ४ फेब्रुवारीला दुपारी साडे तीन वाजता ते मुंबई (Mumbai) प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद (Kiran Mane Press Conference) घेणार आहेत. त्याविषयीची एक सविस्तर फेसबुक पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

किरण माने यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,“ प्रेस काॅन्फरन्स घेतोय उद्या. मुंबईत….लै खुलासे करायचेत.
लै गुपितं उलगडायची हायेत. हा आता माझा एकट्याचा लढा नाय र्‍हायला. तुम्हा सगळ्यांचा झालाय.तुमी कुठल्याबी क्षेत्रात असा, तुमाला न सांगता-गुपचूप कटकारस्थान करून तुमाला कामावरनं काढायची छाती नाय झाली पायजे कुनाची. कुठलीबी स्त्री असो वा पुरूष..तुमच्यावर खोटे आरोप करताना हजारवेळा इचार करंल असं कायतर करून दाखवतो…संविधानिक मार्गानं.. बघाच तुमी !

#किरण_माने_पॅटर्न हितनं फुडं तुमच्यावर कस्लाबी अन्याय होऊ देनार नाय !!!…आवो, पैशाचा… सत्तेचा… वर्चस्ववादाचा माज एकच गोष्ट उतरवू शकते… ‘संविधान’ ! मला वाटलंवतं की ह्या अत्यंत क्रूर, निर्दयीपणे केलेल्या अन्यायाबद्दल या यंत्रनेचा ‘अंतरात्मा’ जागा होईल.. कुठल्यातरी राजकिय नेत्याला आपला सोत्ताचा संघर्ष आठवंल… पन नाय.. ९९% राजकीय नेते भांडलवलदारांचे गुलाम हायेत. माझ्यावर अन्याय करनारी यंत्रना पैशांच्या धुंदीत हाय… “आपण राजकिय नेते खिशात घेऊन फिरतो.. काहीही कारस्थान करू.. हा कोण क्षुल्लक सामान्य माणूस आपल्याशी लढू पहातोय??? अस्सा खड्यासारखा बाजूला करू त्याला.” अशा मग्रूरीत हायेत ही धेंडं.

…पन भावांनो, ही मुजोरी-बेबंदशाही मोडून काढण्याचा शेवटचा मार्ग डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात ठेवलाय की. आता सुट्टी नाय. जीवाचं रान करीन.. रक्ताचं पानी करीन…होत्याचं नव्हतं करीन… पन न्याय मिळवूनच राहीन… जिंकेन नायतर मरेन. जिंकलो, तर तुम्हा सगळ्यांचा विजय आसंल… मेलो…तर मात्र तुम्हा सगळ्यांना मुडद्यासारखं जगत, खाली मान घालून, घाबरत काम करावं लागंल… मान वर केली, आवाज उठवला, बंड केलं तर “ए तुझा किरण माने करेन.” असं सुनावलं जाईल…पन काय बी म्हना.. या लोकांनी अन्याय करायला लै चुकीचा मानूस निवडला भावांनो.. नाय नाय नाय नाय… लै हार्ड मानसाला हात घातलाय ह्या बेट्यांनी ! नाय ह्यांना पळता भुई थोडी केली तर किरण माने नांव लावनार नाय…उद्या…४ फेब्रुवारी.. दुपारी ३.३० वाजता, मी आणि माझे वकिल असिम सरोदे-रमा सरोदे प्रेस काॅन्फरन्स घेतोय… मुंबई प्रेस क्लब.. आझाद मैदान पोलीस स्टेशनसमोर, मुंबई. जमलं तर या.जय जिजाऊ…जय शिवराय… जयभिम… तुकाराम महाराज की जय ! #किरण_माने_पॅटर्न.”

या किरण मानेंच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. आता उद्याच्या पत्रकार परिषदेत किरण माने काय खुलासे करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Web Title: Kiran mane facebook post about press conference in mumbai nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2022 | 04:11 PM

Topics:  

  • Kiran Mane
  • Mulgi Zali Ho
  • star pravah

संबंधित बातम्या

ठरलं तर मग! मालिकेत झळकणार नवी पूर्णा आजी ? कोण आहे ही ज्येष्ठ अभिनेत्री ?
1

ठरलं तर मग! मालिकेत झळकणार नवी पूर्णा आजी ? कोण आहे ही ज्येष्ठ अभिनेत्री ?

‘हाथी घोडा पालकी, बर्थडे कन्हैया लाल की’ स्टार प्लसचा जन्माष्टमी विशेष सोहळा आणि समृद्धी शुक्लाची भावनिक आठवण
2

‘हाथी घोडा पालकी, बर्थडे कन्हैया लाल की’ स्टार प्लसचा जन्माष्टमी विशेष सोहळा आणि समृद्धी शुक्लाची भावनिक आठवण

‘ठरलं तर मग’ मालिका महत्वाच्या वळणावर! प्रिया ठरली दोषी, मालिकेत येणार सात वर्षांचे लीप?
3

‘ठरलं तर मग’ मालिका महत्वाच्या वळणावर! प्रिया ठरली दोषी, मालिकेत येणार सात वर्षांचे लीप?

“अनाजीपंता, कितीबी आग लाव…” ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर किरण मानेंची पोस्ट
4

“अनाजीपंता, कितीबी आग लाव…” ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर किरण मानेंची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.