ना भरजरी कपडे, ना मेकअप तरीही मेटगालामध्ये बहरलं ‘फूल’; ‘लापता लेडीज’ च्या नितांशीच्या साध्या लूकनं जिंकलं मनं!
एकीकडे, आलिया भट्ट मेट गाला 2024 मध्ये सब्यसाची मुखर्जीच्या साडी आणि जबरदस्त मेकअपमध्ये दिसली होती. दुसरीकडे, 'लपता लेडीज' ची नितांशी गोयल अतिशय साध्या शैलीत मेट गाला 2024 चा भाग बनली.
मेट गाला 2024 इव्हेंट (Met Gala 2024) सुरू झाल्यापासून सर्वत्र आलिया भट्टच्या लूकची चर्चा सुरू आहे. सब्यासाची मुखर्जीनी बनवलेली साडी नेसून आलिया मेट गालाच्या रेड कार्पेटवर एखाद्या परीपेक्षा कमी दिसत नव्हती. भरजरी साडी, मेकअप मध्ये आलियाचं सौंदर्य आणखी खुललेलं पाहायला मिळाल. पण या सगळ्यांमध्ये आणखी एका सेलेब्रिटीनं साध्या पेहरावातील आपल्या उपस्थितीनं सर्वांच लक्ष आपल्याकडे खेचलं आहे. ती सेलेब्रिटी आहे नितांशी गोयल(Nitanshi Goel). होय तीच नितांशी गोयल जिने ‘लापता लेडीज’मधे ‘फूल’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. काल नितांशी गोयल देखील मेट गाला 2024 मध्ये दिसली. यावेळी तिनं केलेल्या साधा लूकनं सर्वांच मन पुन्हा एकदा जिंकलं आहे.
[read_also content=”Genelia Dsouzaदेशमुखांच्या सुनेपुढं मेटगालातील भरजरी फॅशनही फेल; साडी आणि हातात हिरव्या बांगडया घालून असलेल्या जेनेलियाच्या साध्या लूकमधील फोटो पाहाच! https://www.navarashtra.com/movies/genelia-dsouza-wearing-saree-and-bangles-simple-look-goes-viral-on-social-media-nrps-530683.html”]
मेट गाला 2024 च्या बागेत बहरलं ‘फूलं’
एकीकडे, आलिया भट्ट मेट गाला 2024 मध्ये सब्यसाची मुखर्जीच्या साडी आणि जबरदस्त मेकअपमध्ये दिसली होती. दुसरीकडे, ‘लपता लेडीज’ ची नितांशी गोयलनं अतिशय साध्या शैलीत मेट गाला 2024 मध्ये एन्ट्री केली. सोमवारी संध्याकाळी आमिर खान प्रॉडक्शनच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलने ‘मिसिंग लेडीज’मधील ‘फूल’चा मेट गाला रेड कार्पेट लूक शेअर केला.
तिच्या वधूच्या पेहरावात दिसली नितांशी
नितांशी गोयलने ‘लापता लेडीज’मधून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्याच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. काल मेट गाला दरम्यान नितांशीनं या चित्रपटातील फूल या व्यक्तिरेखेप्रमाणे पेहराव केला होता. तीने वधूप्रमाणे लाल रंगाची साडी नेसली होती. खांद्यावर मरुण रंगाची शाल ओढलेली आणि कपाळावर लाल टिकली लावली होती. नितांशीने एका हाताने तिची साडी आणि दुसऱ्या हाताने तिची शाल पकडली होती. मेट गाला 2024 च्या रेड कार्पेटवर तिचा हा ‘फूल’ अवतार सगळ्यांना आवडला.
‘फूल’चा साधेपणा पाहून चाहते प्रभावित
नितांशी गोयलने तिच्या सोशल मीडिया अंकाऊंटवरु तिच्या चाहत्यांना सांगितलं की ती मेट गाला 2024 मध्ये सहभागी झाली आहे. नितांशीची ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यावर कमेंट करताना एका चाहत्यानं लिहिलं की, ‘वधूच्या पोशाखात ती खूप सुंदर दिसत आहे’ तर आणखी एका यूजरनं लिहिलं आहे की, ‘या सीझनचं आवडतं ‘फूल’.
Web Title: Laapataa ladies nitanshi goel made her met gala debut nrps