Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सन मराठी’वर लवकरच सुरु होणार दोन अनोळखी व्यक्तींचा एकत्र प्रवास; ‘तू अनोळखी तरी सोबती’ नवी मालिका रिलीज

'सन मराठी' वाहिनीवर नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत असते. आता अशातच वाहिनीवर आणखी एक नवी मालिका 'तू अनोळखी तरी सोबती' ५ जानेवारीपासून सुरु होत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 30, 2025 | 03:21 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘सन मराठी’वर लवकरच सुरु होणार नवी मालिका
  • प्रेक्षकांना दिसणार दोन अनोळखी व्यक्तींचा प्रवास
  • ‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिका होणार सुरु
 

‘सन मराठी’वर ‘तू अनोळखी तरी सोबती’ या नव्या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. मालिकेत अभिनेता अंबर गणपुले आणि अभिनेत्री योगिता चव्हाण ही नवी जोडी येत्या ५ जानेवारीपासून दररोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतीच या मालिकेची प्रेस कॉन्फरन्स पार पडली. चाळ संस्कृती ही मुंबईची खरी ओळख आहे. एकाच भागात असलेल्या पण दोन वेगवेगळ्या चाळीत राहणाऱ्या अर्पिता आणि समीर या दोघांची ही कथा असून, नकळतपणे एकमेकांची काळजी घेणारे हे दोघं कसे एकत्र येतील? नियती या दोघांची मैत्री – प्रेम संबंध जुळवून कसं आणेल?  हे पाहणं रंजक असणार आहे.

‘काश मैं लड़का होती’, Dhurandharच्या स्क्रिप्टवर यामी गौतम फिदा; आदित्य धरच्या चित्रपटाबाबत मोठा खुलासा, म्हणाली…

या मालिकेत अर्पिता हे मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाण म्हणाली की, “या मालिकेच्या निमित्ताने आणखी एक नवीन पात्र घेऊन प्रेक्षकांसमोर मी येत आहे. त्यामुळे मनात थोडी धाकधूक, आनंद अश्या भावना निर्माण झाल्या आहेत. अर्पिता हे पात्र अगदीच साधं, सुशील, कुटुंबाचा विचार करणारी, प्रत्येकाचं मन जपणारी मुलगी आहे. ही एका चाळीत राहणाऱ्या मुलीची गोष्ट असल्याने प्रत्येक वयोगटाच्या प्रेक्षकांना आपलंस करुन घेणारी ठरेल.’

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘अर्पिता आणि योगिता मध्ये प्रचंड फरक आहे. अर्पिता कधीच स्वतःसाठी जगली नाही, नेहमीच दुसऱ्यांसाठी झटत राहणारी ती व्यक्ती आहे. आणि जेव्हा तिच्या आयुष्यातही अशी एक व्यक्ती येईल तेव्हा खरंच मॅजिक होईल. मी सुद्धा गेली २१ वर्ष ठाणे येथील किसननगर चाळीत राहिली आहे. त्यामुळे चाळीत शूटिंग करण्याचा आंनद काही वेगळाच आहे. या मालिकेमुळे चाळीतल्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतोय. प्रेक्षकांना आमची नवी मालिका आणि अर्पिता हे पात्र नक्की आवडेल ही खात्री आहे.’

टीव्हीनंतर आता ईशा मालवीयचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, हाती लागला पंजाबी चित्रपट; दिसणार रोमँटिक अंदाजात

मालिकेत समीर हे पात्र साकारणारा अभिनेता अंबर गणपुले म्हणाला की, “दोन अनोळखी व्यक्तींची ही कहाणी आहे. समीर हे पात्र खूप सौम्य, कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडणारा आहे. कायम चेहऱ्यावर स्मित हास्य, नकारात्मक गोष्टींमधूनही सकारात्मक गोष्टी आत्मसात करणारा आहे. त्यामुळे या पात्राकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. मालिकेचा प्रोमो पाहून बऱ्याच जवळच्या माणसांनी कौतुक केलं. मालिकेचा विषय, साधेपणा या सगळ्याच गोष्टी मालिकेविषयी उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत. मी चाळीत कधी राहिलो नाही. पण ते जीवन मी लहानपणीच्या सुट्यांमध्ये अनुभवलं आहे. चाळ म्हणजे एक मोठं कुटुंब असतं आणि आता समीरमुळे मला चाळीतलं जीवन जगायला मिळतंय. नियती या दोघांची मैत्री – प्रेम संबंध जुळवून कसं आणेल ? हे ५ जानेवारी पासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मी सुद्धा खूप उत्सुक आहे.”

Web Title: Tu anolakhi tari sobati new marathi serial on sun marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 03:21 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

America News : अमेरिकेत गोळ्या झाडून फाशीच्या शिक्षेचे थेट प्रक्षेपण? पोप लिओ चौदाव्यांचा मृत्युदंडाला विरोध
1

America News : अमेरिकेत गोळ्या झाडून फाशीच्या शिक्षेचे थेट प्रक्षेपण? पोप लिओ चौदाव्यांचा मृत्युदंडाला विरोध

Israel News : गाझा युद्धाच्या निषेधार्थ लंडनमध्ये हजारोंचा मोर्चा; पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले नागरिक
2

Israel News : गाझा युद्धाच्या निषेधार्थ लंडनमध्ये हजारोंचा मोर्चा; पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले नागरिक

World News : नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प संतप्त; नॉर्वेच्या नोबेल समितीवर देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप
3

World News : नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प संतप्त; नॉर्वेच्या नोबेल समितीवर देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप

Russia-Ukraine War : रशियन डिझेलवरील निर्बंध शिथिल; झेलेन्स्कींचा अमेरिकेला संतापजनक सवाल, निर्णयाला ‘पुतिन यांना भेट’ म्हटले
4

Russia-Ukraine War : रशियन डिझेलवरील निर्बंध शिथिल; झेलेन्स्कींचा अमेरिकेला संतापजनक सवाल, निर्णयाला ‘पुतिन यांना भेट’ म्हटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.