'ये रिश्ता...' फेम लता सबरवाल- संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार…
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमध्ये अक्षराच्या आईची भूमिका साकारणाऱ्या लता सभरवाल हिने पती आणि अभिनेता संजय सेठपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने ही घोषणा केली असून तिच्या या टोकाच्या निर्णयाचा चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही महत्वाची बातमी दिली आहे. लग्नाच्या १५ वर्षांनंतर अभिनेत्रीने वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री लता सबरवाल हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अधिकृत माहिती दिली आहे.
इंदूला मिळणार का अधूची खंबीर साथ ? ‘इंद्रायणी’ मालिकेमध्ये पुढे काय घडणार
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमध्ये लता आणि संजीवने अक्षराच्या (हिना खान) आई- वडिलांचे पात्र साकारले आहे. ऑनस्क्रिन पती- पत्नी असलेले हे कपल रियल लाईफमध्येही पती- पत्नी होते. लता सभरवालने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, तिने लिहिलेय की, “बराच काळ शांत राहिल्यानंतर आता मी जाहीर करतेय की मी (लता सभरवाल) माझ्या पतीपासून (संजीव सेठ) विभक्त झाले आहे. मला एक प्रेमळ मुलगा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. मी सर्वांना विनंती करते, कृपया माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या प्रायव्हसीचा आदर करा आणि याबद्दल कोणतेही प्रश्न विचारू नका किंवा फोन करू नका.”
अशोक मामा राधा आणि किश्याला अखेर घराबाहेर काढणार!, मालिकेत येणार जबरदस्त ट्वीस्ट
दरम्यान, लता सभरवालचीही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लता आणि सौरभला त्यांच्या चाहत्यांकडून आणि अनेक सेलिब्रिटीमित्रांकडून दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहे. नेमका दोघांनीही वेगळा होण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा त्यांनी केलेला नाही. लता आणि संजीव यांची पहिली भेट २००९ साली ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या सेटवर झाली होती. मालिकेमध्ये दोघांनीही पती-पत्नी राजश्री आणि विशम्भरनाथ माहेश्वरीची भूमिका साकारली होती. त्यानंतर दोघांनीही २०१० साली लग्नगाठ बांधली, लग्नानंतर लता- संजीव यांना एक मुलगाही झाला, ज्याचं नाव आरव आहे. संजीव सेठ यांचं हे दुसरं लग्न होतं. त्यांचं पहिलं लग्न मराठमोळी अभिनेत्री रेशम टिपणीसशी झालं होतं. या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन आपत्य आहे.