Ashok Mama Serial
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘अशोक मा.मा.’ मध्ये अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राधा आणि किश्याच्या कावेबाज युक्त्यांना अखेर मामा कंटाळले असून, या दोघांना घराबाहेरचा रस्ता दादाखवणार आहेत. घरामध्ये आलेल्या पासूनच दोघांचे डावपेच सुरु आहेत पण मामा सगळे सहन करत होते पण आता मात्र ते असह्य झाल्याने मामा हा निर्णय घेणार आहेत. नक्की भागामध्ये काय घडणार ? जाणून घेण्यासाठी नक्की पहा अशोक मा.मा. रविवारी, २२ जून रोजी दु. २:३० वा. आणि रात्री ८:३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
“देवा माझ्या या डार्लिंगला….” अभिनेते अविनाश नारकर यांची परममित्रासाठी खास पोस्ट
किश्या मामा सीसीटीव्ही फूटेजबद्दल देसाई-तोरणेला विचारतात आणि राधाला सांगतात की फुटेज काढण्याचा उपाय सापडला आहे. त्याचवेळी किश्याला एक महत्त्वाची फाईल सापडणार आहे. अशोक मामा, राधा आणि किश्या यांना चंदनच्या कोकणातील घरी कामासाठी पाठवण्याचा निर्णय घेतात. किश्या फाईल घेऊन सोसायटी ऑफिसमध्ये जातो आणि मामांच्या घराचे पेपर्स दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण त्यात काही सापडत नाही. त्याचा डाव फसतो. पण सगळे घडलेले परशु ऐकणार आहे. परशु सर्व माहिती मामांना दिल्यावर मामा तातडीने भैरवीला घरी बोलावणार आहेत.
मामांना सत्य कळले आहे हे राधा आणि किश्याला कळताच मामांची माफी मागणार असून मामा त्यांना स्पष्टपणे म्हणतात, “तुम्ही आम्हाला फसवलं.” आणि दोघांचे बॅग्स घराबाहेर फेकतात. ते ठणकावून सांगतात “ह्या पुढे आमच्या घराजवळ फिरकलात तर पोलिसात तक्रार करेन!” दरवाजा बंद करतात. आता मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी बघा अशोक मा.मा. रविवार दुपारीसुद्धा, २२ जून – दु. २:३० वा. आणि रात्री ८:३० वा. फक्त कलर्स मराठीवर.