Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जन्मा- मरणाच्या गोष्टींची अभूतपूर्व कथा उलगडणार, शिवाली परबच्या ‘मंगला’ चित्रपटाचा लक्षवेधी टीझर प्रदर्शित

'मंगला' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. टीझरमध्ये शिवाली परबसह शशांक शेंडे, अलका कुबल, डॉ. संजीव कुमार पाटील, विशाल राठोड या कलाकारांचा अभिनय लक्षवेधी ठरत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 09, 2024 | 02:19 PM
जन्मा- मरणाच्या गोष्टींची अभूतपूर्व कथा उलगडणार, शिवाली परबच्या 'मंगला' चित्रपटाचा लक्षवेधी टीझर प्रदर्शित

जन्मा- मरणाच्या गोष्टींची अभूतपूर्व कथा उलगडणार, शिवाली परबच्या 'मंगला' चित्रपटाचा लक्षवेधी टीझर प्रदर्शित

Follow Us
Close
Follow Us:

जर्मन तत्वज्ञ फ्रेडरिक यांनी ‘देव मेलाय’ असे वादग्रस्त विधान केलं होतं, हो पण या विधानाला अनेकांनी खोडून काढत प्रचितीची अनेक उदाहरण जगासमोर ठेवली आहेत. नशिबाच्या गोष्टी, नियतीने आखलेले खेळ या सगळ्यांतून जात प्रत्येकजण काही ना काही शिकत असतो. आयुष्यात आलेल्या अनेक संकटांचा निडरपणे सामना करण्याचं धैर्य हा देवचं देतो, त्यामुळे जर्मन तत्वज्ञने केलेलं हे विधान अर्थात चुकीचं म्हणावं लागेल. ती लढाई, ती जिद्द, तो खेळ या सगळ्याचा पलिकडे जात जन्मा- मरणाच्या गोष्टींची अभूतपूर्व कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हो कारण बरेच दिवसांपासून चर्चेत असणारा ‘मंगला’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

रुख्मिणीने जिंकल प्रेक्षकांचं मन; बॉलिवूडला पडली सईच्या अभिनयाची भुरळ!

‘मंगला’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. टीझरमध्ये शिवाली परबसह शशांक शेंडे, अलका कुबल, डॉ. संजीव कुमार पाटील, विशाल राठोड या कलाकारांचा अभिनय लक्षवेधी ठरत आहे. ‘मंगला’ चित्रपटाच्या टीझरने चित्रपटातील रहस्य ताणून ठेवले आहे. ऍसिड हल्ल्याने वाईट वेळ आलेल्या एका गायिकेचा खराखुऱ्या प्रवासाची झलक टीझरमध्ये पाहायला मिळतेय. एखाद्याच्या रूपाबरोबर त्यांच्यातील कलेला पुढे जाऊ न देता वाईट सूड घेऊन काही राक्षसी लोकं या चांगल्या कलेला त्रास देतात, हे चित्रपटात पाहायला मिळतेय. मात्र शेवटी विजय हा नेहमीच सत्याचा होतो असं म्हणतात, त्याप्रमाणे खरंच या हल्ल्यातुन त्या गायिकेचा विजय होईल का हे चित्रपट पाहिल्यावरचं कळेल. नुकताच चित्रपटाचा टीझर आणि संगीत अनावरण सोहळा दणक्यात पार पडला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

‘रैश प्रोडक्शन प्रा.लि’ आणि ‘फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘मंगला’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे. तर चित्रपटातील गाणी निहार शेंबेकर, रोंकिनी गुप्ता, स्नेहल मालगुंडकर या गायकांनी त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केली आहेत. एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून शिवाली परबला मोठ्या पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरेल. मंगलाची ही खरीखुरी कथा १७ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरेल.

शिल्पा-विवियन नातं पुन्हा जोडणार की तोडणार? नात्याचे सत्य आलं समोर

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab first movie mangala teaser and music launch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 02:19 PM

Topics:  

  • marathi film

संबंधित बातम्या

‘होय मी जय भीमवाली…’ ’या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचे बेधडक विधान, सोशल मीडियावर चर्चेचे तुफान
1

‘होय मी जय भीमवाली…’ ’या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचे बेधडक विधान, सोशल मीडियावर चर्चेचे तुफान

‘या’ साऊथ सुपरस्टारला मराठी चित्रपटाची भुरळ, ‘गोंधळ’ चित्रपटाचे केले तोंडभरून कौतुक; म्हणाला ‘हे रत्न…’
2

‘या’ साऊथ सुपरस्टारला मराठी चित्रपटाची भुरळ, ‘गोंधळ’ चित्रपटाचे केले तोंडभरून कौतुक; म्हणाला ‘हे रत्न…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.