(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि दर्जेदार भूमिका साकारणारी सुपरस्टार सई ताम्हणकर सध्या बॉलिवूड गजवताना दिसते आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “अग्नी” मधून हे पुन्हा एकदा सई ने तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे. चाहत्यांना चकित करून टाकले आहे. 2024 मध्ये दमदार काम करणारी आणि कमालीच्या भूमिका साकारणारी सई पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करून गेली आहे. 2024 हे वर्ष सई साठी अनेक गोष्टींसाठी खास ठरलं आणि यात अभिनेत्रीच्या वैविध्यपूर्ण भूमिका तर होत्याच पण सोबतीने अनेक आव्हानं पेलत तिने बॉलिवुड मध्ये स्वतःच्या अभिनयाची जादू दाखवली आहे. ‘मिमी’, ‘भक्षक’ आणि आता ‘अग्नी’ सईच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका या कायम लक्षवेधी ठरल्या आहेत.
अग्नी मधली रुख्मिणी प्रेक्षकांना भावली तर आहेत. पण बॉलिवूड मधल्या बड्या कलाकारांच्या सोबतीने तिने तिची भूमिका चोख पार पाडली आहे. एक गृहिणी असलेली रुख्मिणी खंबीर पाठिंबा देणारी बायको, बहीण आणि आई आहे हे तिने यातून सिद्ध केलं आहे. सईच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असताना बॉलिवूड सोबतीने मराठी कलाकारांनी देखील तिच्या भूमिकेच कौतुक केलं आहे. दिग्गज दिग्दर्शक हंसल मेहता पासून नवाज उद्दिन सिद्दीकी, नोरा फतेह ते मराठी मधल्या अनेक कलाकारांनी अग्नीला वाहवा दिली आहे. चाहत्यांना ही सिरीज आवडली देखील आहे. त्याच्या याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’वरील ‘अग्नी’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. अग्निशमन दलावर आधारित असलेला चित्रपट येत्या ६ डिसेंबरला रिलीज झाला. गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या टीझरला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला होता. चित्रपटाचे कथानक अग्निशमन दलातील अधिकारी विठ्ठल आणि त्यांचा तापट मेहुणा समित यांच्यावर आधारित आहे. मुंबईतल्या आगीच्या रहस्यमय घटनांचा उलगडा ते दोघेही कशापद्धतीने करतात ? हे पाहायला मिळणार आहे. शहरामध्ये लागणाऱ्या आगींमागचे नेमके कारण काय ? ती आग लागत आहे की ? आग लावली जात आहे यामागचा छडा अधिकारी विठ्ठल लावणार आहेत.
Baaghi 4: ‘हर आशिक है खलनायक’, ‘बागी 4’ मधील संजय दत्तचा खतरनाक लूक पाहून होईल थरकाप!
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर लवकर तिचे नवनवीन प्रोजेक्ट्स घेऊन चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. येणाऱ्या काळात सई अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार असून ग्राउंड झीरो, डब्बा कार्टेल हे तिचे आगामी चित्रपट असणार आहेत. ज्यामध्ये ती दमदार पात्र आणि अभिनयाची झलक चाहत्यांना दाखवून देणार आहे. प्रेक्षकांना तिच्या आगामी चित्रपटाची आतुरता लागून राहिली आहे.