(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचं २५ सप्टेंबर रोजीनिधन झालं आहे. मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने सत्य मांजरेकर यांनी सोशल मिडियावर आईच्या आठवणीत एक भावुक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आईची आठवण, तिचा प्रेमळ स्वभाव, आणि त्याच्या आयुष्यातील तिचं महत्त्व व्यक्त केलं आहे. दरम्यान दीपा मेहता यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
महेश मांजरेकर आणि दीपा मेहता यांचं १९७८ साली लग्न झालं होतं. दोघंही कॉलेजपासूनच एकत्र होते. त्यांना अश्वमी आणि सत्या ही दोन अपत्ये आहेत. काही वर्षांनी महेश मांजरेकर आणि दीपा मेहता यांचा घटस्फोट झाला होता. दीपा मेहता या फॅशन डिझायनर होत्या. त्या स्वत:चा ‘क्वीन ऑफ हार्ट्स’ हा साड्यांचा ब्रँड चालवत असत. त्यांची लेक अश्वमी या ब्रँडसाठी मॉडेलिंगही करते. दीपा मेहता यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने आईचा जुना फोटो शेअर करत ‘मिस यू मम्मा’ असं लिहिलं आहे.
“काल करूरमध्ये जे काय घडले…” रॅलीमधील झालेल्या घटनेवर विजय थलापथी भावुक; शेअर केली पोस्ट
महेश मांजरेकर यांचे पहिले लग्न दीपा मेहता यांच्याशी झालं होते. दीपा मेहता या प्रोफेशनल कॉस्च्युम व फॅशन डिझाइनर होत्या.त्यांनी ‘Queen of Hearts’ नावाचा हस्तशिल्प साड्यांचा खास ब्रँड सुरू केला होता.या साड्या त्यांच्या दर्जा, कलाकुसर आणि स्टाइलमुळे मराठी सिनेमा तसेच बॉलिवूड कलाकारांमध्येही लोकप्रिय होत्या. दीपा आणि महेश यांची मुलगी अश्वमी मांजरेकर या ब्रॅंडसाठी मॉडेलिंग करते, तर अश्वमीसुद्दा अभिनयक्षेत्रात आपले नशीब आजमवत आहे.
प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांच्याशी विभक्त झाल्यानंतर दुसरे लग्न मेधा मांजरेकर यांच्याशी केले. मेधा या स्वतःही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत आणि अनेक दर्जेदार चित्रपटांतून त्यांनी अभिनयाची छाप पाडली आहे. मेधा मांजरेकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीतून आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली.‘नटसम्राट’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘दे धक्का’, यांसारख्या चित्रपटांत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.त्या केवळ अभिनेत्रीच नाहीत, तर त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली आहे.