दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा 2 : द रुल’ (pushpa 2 ) या चित्रपटाचा नुकताच टिझर रिलीज करण्यात आला. या टिझरला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. आता प्रेक्षक आतुरतेने चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. टिझरवरुन चित्रपटाच्या भव्यातेचा अंदाज प्रेक्षकांना आला असतानाच आता चित्रपटाबद्दल एक विशिष्ट गोष्ट समोर आली आहे. या चित्रपटातील एका सीनसाठी कोट्यावधी रुपये खर्च केल्याचं समोर आलं आहे. हा सहा मिनटांचा सिन असून त्यासाठी भलीमोठी रक्कम खर्च करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
[read_also content=”मुलींना मासिक पाळी दरम्यान सुटी मिळणार, ‘या’ राज्याच्या विद्यापीठाने घेतला मोठा पुढाकार https://www.navarashtra.com/india/punjab-university-allowed-menstrual-leave-to-girl-students-nrps-522994.html”]
रिपोर्टनुसार, चित्रपटात ‘गंगम्मा जत्रा’ व एक फाइट सीन दाखवण्यात आला आहे; जो ६ मिनिटांचा सीन आहे. याच सीनसाठी ६० कोटी रुपये खर्च केले आहेत. हा सीन शूट करण्यासाठी तब्बल ३० दिवस लागले होते.
तर, चित्रपटाचा एकूण बजेट ५०० कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.
माहितीनुसार, ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स अॅमेझॉन प्राइमने ३० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. आता अल्लू अर्जुनच्या या बहुचर्चित चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स नेटफ्लिक्सने देखील खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. अॅमेझॉन प्राइमने दिलेल्या रक्कमेपेक्षा तीन पट रक्कम नेटफ्लिक्सने या चित्रपटाच्या डिजिटल स्ट्रीमिंग राइट्ससाठी दिली आहे.
‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुकुमार करणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना, अभिनेता फवाद फासिल यांच्या महत्त्वाच्या भुमिका आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.