"तेरे जैसा यार कहा, कहाँ ऐसा यारा ना…" सिद्धार्थ जाधवला भरत जाधव यांच्या हस्ते मिळालं खास गिफ्ट; म्हणाला- 'बहुमान मिळालाय…'
आपल्या दमदार स्टाईल आणि अभिनयाद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या सर्वांचा लाडका ‘सिद्धू’ अर्थात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव… सिद्धार्थने आपल्या सिनेकरियरमध्ये मराठी, बॉलिवूड आणि बंगाली चित्रपटांत काम केले असून अनेक टिव्ही शोमध्येही त्याने काम केले आहे. सिद्धार्थ एक उत्कृष्ट अभिनेत्यासोबतच एक उत्कृष्ट कॉमेडियनही आहे. सिद्धार्थला कोणत्या वेगळ्या परिचयाची गरज नाही. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्हीही माध्यमांद्वारे सिद्धार्थ जाधव प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सिद्धार्थने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करुन २५ वर्षे झाली आहे. त्यानिमित्त अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
“मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की…”; पहलगाम हल्ल्यावर अक्षय कुमारचा संताप अनावर, Video Viral
शेअर केलेल्या ह्या व्हिडिओमध्ये सिद्धार्थची आणि त्याच्या कलाकार मित्रांची मैत्री पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ जाधवला ‘आता थांबायचं नाय’ या चित्रटाच्या निमित्त सेटवरील त्याच्या जवळच्या व्यक्तींकडून एक खास भेट मिळाली, त्यामुळे अभिनेत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, प्रवीण डाळींबकर, किरण खोजे, पंकज पंचारिया आणि भरत जाधव या त्याच्या जवळच्या मित्रांनी अभिनेत्याला चक्क त्याचा फोटो असणारं, टपाल तिकीट भेट म्हणून दिले आहे. विशेष म्हणजे त्या स्टॅम्प तिकिटावर सिद्धार्थसोबत भरतचाही फोटो आहे. सिद्धार्थची सिनेइंडस्ट्रीतील २५ वर्षे साजरी करण्यासाठी त्याला ही भेटवस्तू देण्यात आली. या स्टॅम्प तिकीटांशिवाय सर्वांनी मिळून त्याला एक फ्रेम केलेले पत्रही भेट म्हणून दिले आणि त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. अभिनेत्याने लांबलचक पोस्ट शेअर करत सर्वांचे आभारही मानले आहेत.
‘भारताचे मीठ खाते आणि पाकिस्तानशी एकनिष्ठ…’, काश्मीर संबंधित पोस्ट लाईक करून फसली Ayesha Khan!
सिद्धार्थ जाधवने पोस्ट लिहिताना असे म्हटले की, ” ‘आता थांबायचं नाय!’ चित्रपटाच्या निमित्ताने आज माझ्या अवघ्या पंचवीस वर्षांच्या या कारकिर्दीत बहुमान मला मिळालाय आणि तोही माझ्या हक्काच्या माणसांकडून! आपण ज्या काळातून आलो, त्या काळी पत्र, टपाल आणि त्या टपालावरचं ते खास “स्टॅंप तिकीट” याचं वेगळंच महत्त्व होतं. तेव्हा प्रत्येक टपाल तिकीट आपल्या मनावर खोलवर ठसा उमटवायचं. त्या छोट्याशा तिकीटावर आपल्या देशाचे थोर नेते, आदर्श व्यक्ती, आणि जगभरात लौकिक मिळवलेल्या महान गोष्टींना स्थान मिळायचं. ते तिकीट म्हणजे केवळ कागदाचा एक तुकडा नव्हता; ती होती एक सन्मानाची मोहर, एक प्रतिष्ठेचं प्रतीक, आणि एक अभिमानाची खूण. “माझ्या फोटोचं हे टपाल तिकीट” मिळावं यासाठी पंकज पंचारियाने केलेले विशेष प्रयत्न, आपल्या माणसाची धडपड. भावा… हा क्षण माझ्या आयुष्यात आणण्यासाठी तू केलेली मेहनत… किरण खोजे, प्रवीण डाळींबकर, पंकज पंचारिया आणि आदरणीय भरत जाधव सर. तुमचं प्रेम, तुमचा विश्वास आणि तुमच्या आशीर्वादाची मायेची ऊब अशीच आयुष्यभर माझ्या पाठीशी राहू द्या. तुमच्याच प्रेरणेनं, तुमच्याच भरवशावर, आणि तुमच्याच सोबतीनं आता हा प्रवास करायचाय. आपल्या सर्वांसाठी एकच मंत्र आहे— “long drive group” ‘आता थांबायचं नाय!’ पंकजला सहकार्य केल्याबद्दल सौरभ देशमुख सर मनापासून आभार…” अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केली आहे. तसेच त्याने कमावलेल्या जीवाला जीव देणाऱ्या मित्रांचेही चाहत्यांनी कौतुक केले.