Kiran Mane Post Actor Share Liaquat Ali Chattha Video And Take Dig At Evm Machine Assembly Election Result
गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यात विधानसभा निवडणुका आटोपल्या. निवडणूकांचा निकाल लागल्यानंतर विरोधी पक्षांमध्ये, इव्हीएमविरोधात सूर अधिक आवळला. काही ठिकाणी तर इव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅडमधील मतांमध्ये काही आकड्यांनी फरक जाणवला. तेव्हापासून विरोधकांमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड असल्याच्या चर्चा अधिकाधिक होऊ लागल्या. निकाल लागल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर इव्हीएम हॅक करत निवडणुक जिंकल्यांचे म्हटलंय.
जगात क्वचितच काही देशांमध्ये मतदानासाठी इव्हीएममशीनचा वापर केला जातो. यामध्ये भारत, पाकिस्तानसह बऱ्याच देशांचा समावेश होतो. अभिनेता किरण मानेने इन्स्टाग्रामवर पाकिस्तानच्या एका वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यानं राजीनामा दिल्याचा व्हिडिओ शेअर केला. ९ महिन्यांपूर्वी पाकिस्तानात पंतप्रधान पदाची निवडणूक पार पडली. या निवडणूकीनंतर देशात पंतप्रधान कोण होणार? यासाठी तिथल्या पक्षांमध्ये अनेक वाटाघाटी सुरू होत्या. तेव्हाच पाकिस्तानातील एका वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिला. लियाकत अली चट्ठा असं या वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्याचं नाव. मतमोजणीत गडबड केली, मला मृत्युदंडाची शिक्षा द्या…असं त्यांनी म्हटलं होतं. तोच व्हिडिओ किरण मानेनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने भलं मोठं कॅप्शन सुद्धा लिहिलंय, कॅप्शन देताना अभिनेता म्हणतो, “निवडणुकांमध्ये आम्ही मशिनमध्ये भ्रष्टाचार केला. सत्तर ऐंशी हजारांच्या लीडनं पुढे चाललेल्या उमेदवारांना कारस्थान करून हरवलं. याचा मला मला पश्चात्ताप होत आहे. मी देशाच्या जनतेची फसवणूक केली आहे. माझ्यावर पोलीस कारवाई व्हावी.”…पाकिस्तानच्या इलेक्शन कमिशनचा कमिशनर लियाकत अली चट्ठा याने राजीनामा देत पाकिस्तानमधील निवडणुकांमध्ये झालेल्या घोटाळ्याची पोलखोल केली होती. लै जुनी घटना नाही भावाबहिणींनो… फक्त नऊ महिन्यांपुर्वी हे झालंय ! १३ जागांवर झालेल्या निवडणुकांमध्ये सत्ताधार्यांचे ११ हरत असलेले उमेदवार आम्ही गैरप्रकार करून निवडून आणले याची त्यानं स्पष्ट कबुली दिली होती ! आपण देशाच्या जनतेला फसवलं म्हणून त्याचं मन त्याला खाऊ लागलं… झोप उडाली… अन्नाचा घास घशाखाली जाईना… शेवटी सर्वशक्तीमान खुदाला साक्षी मानून त्यानं गुन्हा कबुल केला ! असो. सहज आठवलं म्हणून टाकलं. आपला तसा काय संबंध नाय. पाकिस्तानपेक्षा आपण लै प्रगत आहोत. लै पुढची पायरी गाठलीय आपण. आपली बरोबरी आणि पाकिस्तान? ह्यॅ… शब्बा खैर”
पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिल्पाचा फिटनेस पाहिली का ? अभिनेत्रीने शेअर केले जिममधले Photo
अशी खोचक पोस्ट अभिनेता किरण मानेने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या ह्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.