Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“वरवरचं हसताना, कधीतरी विष पिऊन आणि…” तुषार घाडीगावकर आत्महत्या प्रकरणावर मराठमोळ्या अभिनेत्याची डोळ्यात अंजन टाकणारी पोस्ट

अभिनेता तुषार घाडिगांवकर याच्या आत्महत्येवर मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी पोस्ट करताना दिसत आहे. अभिनेता श्रेयस राजे याने तुषार घाडिगांवकरच्या आत्महत्येवर भाष्य केले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 22, 2025 | 02:22 PM
"वरवरचं हसताना, कधीतरी विष पिऊन आणि..." तुषार घाडीगावकर आत्महत्या प्रकरणावर मराठमोळ्या अभिनेत्याची डोळ्यात अंजन टाकणारी पोस्ट

"वरवरचं हसताना, कधीतरी विष पिऊन आणि..." तुषार घाडीगावकर आत्महत्या प्रकरणावर मराठमोळ्या अभिनेत्याची डोळ्यात अंजन टाकणारी पोस्ट

Follow Us
Close
Follow Us:

नाटक, मालिका आणि चित्रपट या तिनही माध्यमांमध्ये काम करणाऱ्या अभिनेता तुषार घाडिगांवकरने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे वृत्त ऐकून अवघी इंडस्ट्री हळहळली आहे. इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नसल्यामुळे मराठमोळ्या अभिनेत्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. ‘मन कस्तुरी रे’, ‘लवंगी मिरची’, ‘भाऊबळी’, ‘उनाड’, ‘हे मन बावरे’ आणि ‘झोंबिवली संगीत बिबट’ सारख्या अनेक कलाकृतींच्या माध्यमातून ३२ वर्षीय अभिनेत्याने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे. त्याच्या आत्महत्येवर मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी पोस्ट करताना दिसत आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदारनंतर मराठमोळा अभिनेता श्रेयस राजेने पोस्ट शेअर केली आहे.

विजयच्या शेवटच्या चित्रपटाचा टीझर रिलीज, चाहते पाहून झाले भावुक

अभिनेता श्रेयस राजे याने पोस्टमध्ये म्हटलंय की,

“मनात तीव्रतेने जे आलं ते व्यक्त झालो आहे! पटलं तर नक्की शेयर करा!!”
“आपण कसे दिसायला लागलोय? आपल्या चेहऱ्यावर निराशेचे किती थर चढले आहेत? आपण नेमक्या कुठल्या गर्तेत आहोत? आपल्याला नेमकं काय आणि किती छळतंय? आत काय काय जळतंय? काय काय शमवावंस वाटतंय? आपण खरंच मनसोक्त जगतोय की जगण्याचा भास निर्माण करतोय? खोल खोल खोल आत काय दडलंय आणि उसन्या चढवलेल्या चेहऱ्यावर देखावा म्हणून काय सोडलंय? खरंच ऊर भरून आनंदाने श्वास घ्यावासा वाटतोय की तोच श्वास दाबून टाकवासा वाटतोय? हे सगळं आपलं आपल्याला चांगलंच ठावूक असतं! वेळोवेळी जाणवत असतं. पाठीवर बसलेल्या वेताळासारखं हे सगळं आपण कधीतरी वागवतच असतो जगताना. ज्याला आपण वैद्यकीय भाषेत डिप्रेशन, अँक्साईटी, मेंटल इलनेस इत्यादी इत्यादी बरंच काही म्हणत असतो. पण सोप्या शब्दात ह्याला “मी बरा किंवा बरी नाहीय, माझं मन बरं नाहीये, माझं चित्त थाऱ्यावर नाहीये, माझा मेंदू शांत नाहीये, मला आधार हवाय, मी अडकलोय, मला बोलायचंय कोणाशीतरी, माझ्याशी बोला!!!” असं म्हणतात! ”

“म्हणतो का आपण असं सगळं उघड करुन कोणाजवळ? म्हणत असू तर उत्तमच! पण जे म्हणत नाहीत, म्हणू शकत नाहीत त्यांचं काय होतं? ते असे काल परवा पर्यंत आपल्याला दिसतात कुठेतरी वरवरचं हसताना आणि एक दिवस कधीतरी विष पिऊन, पंख्याला लटकून, ट्रेन खाली किंवा ट्रक खाली येऊन, उंच इमारतीवरून उडी घेऊन संपवतात स्वतःचं आयुष्य. त्यांच्यासाठीचं जग संपतं! पण प्रश्न सुटतो? जाणाऱ्यापुरता सुटतही असेल. पण उरणाऱ्यांचं काय? आपण कुणीच अमरत्वाचं वरदान घेऊन जन्माला आलेले नाहीचोत. मरण अटळ आहे. अंतिम सत्य आहे! पण ते आपल्याच हाताने स्वतःवर ओढवून घ्यायच्या आधी काहीच पर्याय उरत नसतो का? आपण इतके हतबल का होत असतो? जगात असं कुठलं नं सुटणारं कोडं असतं की जे आपला जीव आपल्याच हातून हिरावून घेतं?? खरंतर कुठलंच नाही! मग आपण आपलंच आयुष्य इतकं जटील का करुन टाकतो? जगायला, जिवंत राहायला जगण्यातली बेफिकिरी लागते असं मला ठामपणे वाटायला लागलं आहे. कितीही अवघडातली अवघड परिस्थिती असेल, आपल्याच चुकांमुळे ती आपल्यावर ओढवली असेल किंवा कुठलाच मार्ग उरला नाहीये असं वाटत असेल तरी ‘बिनधास्त जगा मित्रांनो!!’ कितीही कठीण वाटत असलं तरी जगणं सुंदर आहे. फारफारतर काय होईल?? त्रास सहन करण्याचे दिवस वाढतील. पण त्रास संपणारच नाही, प्रश्न सुटणारच नाहीत असं अजिबात नाही. वेळ, काळ आणि परिस्थिती सतत बदलत असते हा सृष्टीचा नियम आहे. आकस्मिक किंवा नैसर्गिक मृत्यू येईपर्यंतचं आयुष्य निरंतर आहे. वाहणारं आहे. क्षणोक्षणी बदलणारं आहे. कायमस्वरुप कशालाच नाही. जसं सुखाला नाही तसंच दुःखालाही नाहीच. जे आहे जसं आहे ते खरं बोला! व्यक्त व्हा!! मनावर चढवलेले सगळे पडदे फाडून टाका. स्पष्ट शब्दात नागडे व्हा! सहजासहजी आपल्याला हे जमत नाही. पण प्रयत्न करण्याची सुरुवात तर आपण करुच शकतो.. नाही का? ”

“नेमकं हेच करायला आपण घाबरत असतो. कशाची भीती वाटत असते आपल्याला? लोक आपलं हसं करतील ह्याची? आपली लायकी काढतील ह्याची? आपण कसे नाकर्ते आहोत याची चवीचवीने चर्चा करतील ह्याची?? की आपल्याला कमीपणा पत्करावा लागेल ह्याची? भीती ही जगण्यामधली आवश्यक भावना आहे असं म्हणतात. पण मग वाटूनच घ्यायची असेल तर स्वतःचा जीव घेतानाही भीती वाटू द्या. मी गेल्यानंतर माझ्या मागे असणाऱ्यांचं काय? स्वतःला ह्या सगळ्यातून मोकळं करताना आपण आपल्यामागे बऱ्याच जणांना कोंडून जाणार आहोत ह्याची एकदातरी जाणीव होऊद्या! पावलं वळायला नक्की मदत होईल! व्यवसायातलं अपयश, कर्ज, कौटुंबिक समस्या, स्वतःचा अतीव राग, अपराधीपणाची भावना, नैराश्य, फसलेली प्रेम प्रकरणं, आयुष्याच्या शर्यतीत मागे पडत जाण्यामुळे तयार झालेली घुसमट इत्यादी इत्यादी काहीही कारण असलं, तरी या कशावरच आत्महत्या हा उपाय नाही. असलीच तर ती पळवाट आहे. निर्सर्गाने जे आयुष्य नं मागता आपल्याला दिलं आहे ते संपवण्याचा दुसऱ्यांप्रमाणेच आपल्या स्वतःलाही अधिकार नाही. मानसिक आरोग्य ताळ्यावर नसणं हे मनुष्य जन्माचं बायप्रोडक्ट आहे. त्याच्याकडे बायप्रोडक्ट म्हणूनच पहायला हवं. कुठल्याही मानसिक समस्येला इतकं मोठं कधीच होऊ देऊ नका ज्याने तुमचं अस्तित्वच नष्ट होईल. आत्महत्त्या करण्याचा विचार करण्यापासून कृती करतानाच्या क्षणापर्यंत त्या व्यक्तीच्या डोक्यात नेमकं काय सुरू असतं ह्याचं गूढ अजूनही आपल्याला उकललं नाहीय. ते करणाऱ्यालाच ठावूक! पण तो ‘विचार ते कृती’ च्या मधली वेळच खूप महत्वाची. आपल्या अवतीभवती बघा, आपल्या ओळखीतला कोणी ह्या मधल्या कैचित सापडला तर नाहीय ना ह्याची सतत चौकशी करत राहा. जितकं निराश माणसाने व्यक्त होणं गरजेचं तितकंच सुदृढ माणसाने त्याचा कान होणं, त्याचं ऐकणं, तो एकटा नाहीय ह्याची त्याला जाणीव करुन देणं महत्त्वाचं! कुणाचातरी हात हातात घेऊन एक अवघड पूल ओलांडण्याची गरज असते. तो ओलांडल्या नंतरचं गाव सुंदर असतं! आपल्याला तो हात हवा असेल तर तो मागायला लाजू किंवा कचरू नका…. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!! ’ तुषार घाडीगावकर (घाडी) तुला भावपूर्ण श्रद्धांजली!!”

“पण भयानक वाईट घडले…” तुषार घाडिलकरच्या आत्महत्येवर मराठमोळी अभिनेत्री हळहळली

Web Title: Marathi actor shreyas raje expressed grief after tushar ghadigaonkar suicide case shared emotional post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi film
  • Marathi Film Industry

संबंधित बातम्या

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा
1

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला
2

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!
3

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन
4

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.