Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर स्वप्नांची नगरी मुंबईत अभिनेत्री मीरा जोशीचं ‘स्वतःचं घर’ झालं साकार

मराठी अभिनेत्री मीरा जोशीने मुंबईत स्व:चं घर घेतलं आहे. याची खास पोस्ट तीने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 03, 2025 | 02:32 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई घर घ्यावं असं प्रत्येकालाच वाटते, मात्र, मुंबईतील आकाशाला भिडणाऱ्या घरांच्या किमती पाहता, हे स्वप्न पूर्ण करणं सहज शक्य होत नाही. मात्र, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी मराठी अभिनेत्री मीरा जोशी हिने तिचं हे स्वप्न साकार केलं आहे.

मीरा जोशीने मुंबईत स्वतःचं घर विकत घेतलं असून, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तिने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला. या खास क्षणाचे फोटो आणि भावना तिने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. मीराने १३ व्या मजल्यावर घर घेतलं आहे. ती म्हणाली, ”१३ हा नंबर माझ्या खूप जवळचा आहे. माझी जन्मतारीख १३. माझ्या फ्लॅटचा फ्लोअर नंबर १३ च आणि फ्लॅट नंबरसुद्धा १३च. हा निव्वळ योगायोग नाही, जणू काही युनिव्हर्स मला येथे आणण्यासाठी एकवटलं होतं असं म्हणावं लागेल. म्हाडाचे हे सगळं गणित जुळवून आणल्याबद्दल आभार! मुंबईत फ्लॅट असावा हे स्वप्न मी गेली पंधरा वर्षे उराशी बाळगून होते. कारण हीच आता माझी कर्मभूमी आहे. १५ वर्षांपूर्वी मुंबईत आले. मुंबईने आपलंसं केलं. अर्थात मुंबई सर्वांनाच आपलं करून घेते. इतकी वर्षे भाड्याच्या घरात राहिले. भाड्याच्या घरातही चांगले दिवस गेले. कोणत्याच घरमालकाने कधी खाली करा सांगितले नाही. पण स्वतःचं असं एक घर असावं असं कोणाला वाटत नाही!”

 

पुढे मीराने सांगितलं की “माझा स्वभाव उधळा नसल्याने माझं पंधरा वर्षांच थोडंफार सेव्हिंग होतं. माझ्या दादाचं सलील जोशी योग्य सल्ला असल्याने पै आणि पै अगदी योग्य ठिकाणी सेव्ह झाली होती. पण ती रक्कम एक फ्लॅट घेण्यासाठी पुरेशी नव्हती. फ्लॅट घेण्यासाठी पालक देऊ करत असलेली मदत मी नम्रपणे नाकारली खरी पण अडचण अशी आली की या क्षेत्रामधील लोकांना बँका लोन देत नाहीत. कारण आमचा ठोस असा इन्कम नसतो. मग बाबांनी माझं फर्स्ट नाव आणि त्यांचं सेकंड नाव , असं महाराष्ट्र बँकेचे होम लोन करून दिले. फायनली माझं आज घर झालं. खरंतर हे वर्ष धाडसाचं होतं. चॅलेंजिंग होतं. स्वप्नांना योग्य दिशा देणार होतं म्हटलं तरी चालेल. माझं प्रॉडक्शन हाऊस ’कृष्णसखी’ मी याच वर्षी सुरु केलं आणि घर घेण्याचा योगसुद्धा याच वर्षी आला”.

“माझ्या आईने नेहमीच माझ्यावर विश्वास दाखवला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूल्यांशी कोणतीही तडजोड न करता स्वतःच्या अटींवर काम करण्यास प्रवृत्त करणं असो. माझ्या आईमुळेच रत्नागिरीतील एक मुलगी स्वप्नांच्या शहरात मोठी स्वप्ने पाहू शकली.अर्थात प्रत्येक प्रोफेशन मध्येच आपापल्या परीने संघर्ष असतो. तसा तो मी पण केला त्यात काही मोठे केलं असं मला वाटत नाही. माझे आई-बाबा, माझा दादा, माझा मित्र दुर्गेश, माझा मामा, पूनम मामी आणि माझ्यावर प्रेम करणारे आपण सर्व प्रेक्षक मायबाप या सर्वांचे आभार माझ्या चढत्या आलेखासाठी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माझी काळजी घेतल्याबद्दल आणि चढ-उतारांमध्ये मला मार्गदर्शन केल्याबद्दल मी देवाचे आभार मानते. तो माझ्यासोबत सदैव असणार आहे मला त्याची खात्री आहे”, असं म्हणत मीराने तिच्या या प्रवासात सोबत असलेल्या सगळ्यांचे आभार मानले आहेत. तिच्या या पोस्टवर चाहते, सहकलाकार आणि मित्रमंडळींकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Web Title: Marathi actress meera joshi buys new home in mumbai shared video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 02:32 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • Marathi News

संबंधित बातम्या

Kolhapur News : महायुतीत ‘नाराजीनाट्य’नगराध्यक्षपदासाठी सात जागेवर भाजपाचा दावा; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा
1

Kolhapur News : महायुतीत ‘नाराजीनाट्य’नगराध्यक्षपदासाठी सात जागेवर भाजपाचा दावा; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

Mira Bhayander : धक्कादायक ! खुलेआमपणे अंमली पदार्थांचं सेवन ; समाजसेविका श्वेता पाटील यांची धडक कारवाई
2

Mira Bhayander : धक्कादायक ! खुलेआमपणे अंमली पदार्थांचं सेवन ; समाजसेविका श्वेता पाटील यांची धडक कारवाई

”यापेक्षा मोठं भाग्य नाही..” संभवामी युगे युगे’वर बोलताना अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केल्या भावना व्यक्त, म्हणाली…
3

”यापेक्षा मोठं भाग्य नाही..” संभवामी युगे युगे’वर बोलताना अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केल्या भावना व्यक्त, म्हणाली…

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत
4

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.