मराठी इंडस्ट्रीमधील लाखो तरूणांची धडकन बनलेली प्राजक्ता माळी पुन्हा एकदा आपल्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. या फोटोशूटवर नेटक-यांनी चांगलचं तोंडसुख घेतलं आहे. प्राजक्ताने फोटोला कॅप्शन देताना…म्हटलं आहे. (Prajakta mali) “हुस्न-ओ-इश्क़ के दम से ज़माना, यही हक़ीक़त है बाक़ी फ़साना..”
एक उत्तम अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीची ओळख….चित्रपट,मालिका,कविता,निवेदन या सगळ्यावर तिने आपल्या कलागुणांनी छाप पाडली आहे. मात्र, या लाडक्या प्राजूने केलेल्या या फोटोशूमुळे ती ट्रोल झाली आहे
प्राजक्ता ही सोशल मीडियावर सध्या सक्रीय झाली आहे. नुकतंच प्राजक्ताने एक फोटोशूट केलं. त्यात तिने सिल्व्हर रंगाची साडी परिधान केली आहे. तिचे हे फोटोशूट पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
प्राजक्ता कायम विविध कारणांमुळे चर्चेत असल्याचं पाहायला मिळतयं. तिने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तिच्या भूमिकांचं कौतुक होताना दिसलं. ती लवकरच एका चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे.
प्राजक्ता माळीबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतील सिनिअर अभिनेत्री ऐश्वर्या नारकरही तिच्या हॉट फोटोशूटमुळे नेटक-यांमध्ये चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या तिच्या फिटनेसमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. वयाच्या 45 व्या वर्षीसुद्धा तिने आपला फिटनेस टिकवून ठेवला आहे. सध्या तिची सातव्या मुलीची सातवी मुलगी ही सिरीयल सुरू आहे. या सिरीयलमध्ये ती ग्रे शेडची भूमिका साकारत आहे. मात्र, ऐश्वर्याला नेटक-यांनी ट्रोल न करता तिच्या फिटनेसचं कौतुक केलं.इतकचं नाही तर, तिच्या फोटोशूटला पॉझिटीव्ह कमेंटस् दिल्यात.
या फोटोमध्ये ऐश्वर्याने बॅकलेस ब्लाऊज घातलं असून, कॉटन साडीमधली ऐश्वर्या खूपच एलिगंट दिसत आहे. तिच्या चेह-यावर वय दिसत नसलं तरी ती तिच्या लूकमुळे महिलावर्गात कुतुहलाचा विषय बनली आहे.
या फोटोशूटवरून मराठी नट्याही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव आहेत. कोणी काहीही बोलो प्राजक्ता आणि ऐश्वर्याच्या हॉट फोटोशूटमुळे मराठी इन्डस्ट्रीत खळबळ माजवली हे मात्र नक्की….
फोटो सौजन्य -सोशल मीडिया