Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दशावतार’ या मराठी ब्लॉकबस्टरचा गोव्यात धुमाकूळ! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले कौतुक

‘दशावतार’ या मराठी ब्लॉकबस्टरने महाराष्ट्रासह अनेक राज्यांत धुमाकूळ घालत गोव्यातही प्रचंड लोकप्रियता मिळवली. पारंपरिक लोककलेला जागतिक पातळीवर पोहोचवणाऱ्या या चित्रपटाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कौतुक केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 19, 2025 | 07:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

‘दशावतार’ या भव्य मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटाने महाराष्ट्राबरोबरच गोवा, दिल्ली, आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि मध्यप्रदेश अशा अनेक राज्यांत जबरदस्त यश संपादन केले आहे. पारंपरिक कोकणी लोककला रंगमंचावरून चित्रपटाच्या पडद्यावर आणून ती नव्या उंचीवर नेण्याचे श्रेय या चित्रपटाला जाते. या निमित्ताने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संपूर्ण टीमला विशेष आमंत्रण देऊन अभिनंदन केले. ते म्हणाले, “सिंधुदुर्ग, कारवार येथे मोठ्या प्रमाणात होणारा दशावतार हा कलाप्रकार गोव्यामध्ये देखील तितकाच लोकप्रिय आहे. मला आनंद आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने दशावतार ही कला जागतिक पातळीवर जात आहे”. यावेळी त्यांनी ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर यांचा सन्मान केला आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हा चित्रपट जावा, यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दशावतार चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनींगही करण्यात आले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सर्व मान्यवरांनी या चित्रपटाचा आस्वाद घेतला.

‘या अली’ , ‘बिन तेरे, तेरे बिन’ सारख्या हिट गाण्यांच्या गायकाचा मृत्यू… परदेशात स्कुबा डायव्हिंग करताना अपघात

दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री स्तरावरून मिळालेल्या या सन्मानामुळे कलाकार व तंत्रज्ञांचा उत्साह अधिक वाढला आहे. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण कुडाळ व गोवा सीमेवर झाल्याने गोंयकर प्रेक्षकांनाही तो आपलासा वाटत आहे. कोकण व गोव्याची संस्कृती व परंपरा एकमेकांना जोडून ठेवतात, त्यामुळे गोव्याच्या प्रेक्षकांनीही या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

झी स्टुडिओज प्रस्तुत व ओशन फिल्म कंपनी निर्मित या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल आणि आरती वडगबाळकर अशी दिग्गज कलाकारांची फळी झळकते.

नागरिकांचे प्रश्न ऐकल्यावर, कंगनानं वाचला तिच्याच अडचणींचा पाढा म्हणाली, मलाही समजून घ्या… 

कोकण-गोव्याच्या लाल मातीतील ही कलापरंपरा आता महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता भारतभर आणि परदेशातील रसिकांच्या मनालाही भिडते आहे. बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणावर यश मिळवत, हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडतो आहे. विषय सार्वत्रिक असल्याने तो फक्त मराठी नव्हे, तर सर्व भाषिक प्रेक्षकांना आपलासा वाटत आहे.

Web Title: Marathi blockbuster dashavtar creates a sensation in goa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 07:30 PM

Topics:  

  • marathi cinema

संबंधित बातम्या

सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी! ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ मधील पहिलं शीर्षक गीत प्रदर्शित
1

सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी! ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ मधील पहिलं शीर्षक गीत प्रदर्शित

एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं ‘मॅजिक’; सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच
2

एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं ‘मॅजिक’; सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

‘क्षणभर थांबलेला सूर्य…’, रितेश देशमुखने ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पूर्ण केले शूटिंग; पोस्ट शेअर करत झाला भावुक
3

‘क्षणभर थांबलेला सूर्य…’, रितेश देशमुखने ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पूर्ण केले शूटिंग; पोस्ट शेअर करत झाला भावुक

लग्नाचा उत्साह गोंधळात बदलला तर? हीच धमाल पाहायला मिळणार ‘लग्नाचा शॉट’ चित्रपटात; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित
4

लग्नाचा उत्साह गोंधळात बदलला तर? हीच धमाल पाहायला मिळणार ‘लग्नाचा शॉट’ चित्रपटात; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.