(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजला आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपा खासदार आणि बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणौतने 18 सप्टेंबर रोजी कुल्लू मनालीमधील सोलंग आणि पलचान या आपत्तीग्रस्त भागांची पाहणी केली. पण तिला नागरिकांचा रोष पत्करावा लागला.
कंगनानं काही आपत्तीग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर नागरिकांशी संवाद साधला.यावेळी एक महिला कंगनाला आपले दु:ख सांगू लागली तेव्ही तिचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी तीने आपल्याच अडचणींचा पाढा वाचण्यास सुरूवात केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावेळी व्हिडिओमध्ये कंगनाला सार्वजनिक समस्यांशी संबंधित प्रश्न विचारले होते, मात्र त्याची उत्तर तिने काही वेगळीच दिली.यावेळी ती म्हणाली”मनाली येथील माझ्या रेस्टॉरंटने काल फक्त 50 रुपयांची कमाई केली आणि पगार व देखभालीचा खर्च 15 लाख रुपये आहे”
हिमाचल प्रदेश के बाढ़ प्रभावित इलाके में एक महिला जब अपनी स्थानीय सांसद कंगना रनौत से अपना कष्ट साझा किया तो उनसे सांसद का जवाब सुनें! pic.twitter.com/nuVOXLev76
— Narendra Nath Mishra (@iamnarendranath) September 18, 2025
जावेद अख्तर आणि शबाना आझमींचा कपल डान्स, रोमँटिक स्टेप्स! व्हिडिओ होतोय व्हायरल…
व्हायरल झालेल्या व्हिडिओत कंगना म्हणते, मी देखील इथेच राहते. अनेकजण माझ्याकडं मदत मागायला येतात, पण माझं दु:ख कोण समजणार. मी एकटी महिला आहे, जी सगळं स्वत:हून करतेय. माझं हॉटेल आहे. त्याची दिवसाची कमाई फक्त ५० रुपये झाली आहे. महिन्याचा खर्चच त्याचा १५ लाख आहे. केंद्र सरकारनं सगळ्याचे प्रश्न , सगळ्यांचं दु:ख जाणून घेतलं असून 10 हजार कोटींहून अधिकची मदत केंद्र सरकारनं पाठवली आहे.”
त्यानंतर कंगना पुढे म्हणाली, ”मी इंग्लंडची राणी आहे आणि काहीही करत नाहीये असं समजून माझ्यावर हल्ला करू नका.” या व्हिडिओत नागरिक त्यांच्या समस्या सांगत असतानाच कंगनानं तिच्या हॉटेलचंही नुकसान होत असल्याचे सांगितल्याने नेटकऱ्यांनी तिला चांगलच ट्रोल केलं आहे. कंगना ही दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते.