
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सध्या कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिका चर्चेत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. तसेच आता या मालिकेत इंद्रायणीला नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहेत. तिच्या या मालिकेत नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या आगामी भागात नक्की काय घडणार आपण हे जाणून घेणार आहोत.
कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेतील घटनाक्रम आता अधिकच रोमांचक वळण घेत आहेत. इंद्रायणीला वारंवार येणाऱ्या संकटाविषयीचे संकेत आता सतत मिळत आहेत. तिच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारण तिला वारंवार एकच संकेत मिळतो आहे की “संकट येणार आहे”. तिच्या स्वप्नात तिला अलर्ट करणारे गोविंद महाराज आणि त्यानंतर त्याच स्वप्नात दिसणाऱ्या संकटाचं सावट म्हणजेच श्रीकलाचा चेहरा पाहून इंदू गोंधळलेली आहे.
नेमकं श्रीकला हीच दिग्रसकर घराण्यावरचं संकट आहे का? की काहीतरी अजून खोल दडलंय? तसं असेल तर इंद्रायणी याचा सामना कसा करणार? श्रीकला बाबत असलेली इंदूची शंका खरी ठरणार का? या सगळ्याचा विचार करणारी इंद्रायणी आता दिग्रसकर कुटुंबाची सून म्हणून आणि घराची रक्षणकर्ती म्हणून घराचं रक्षण करण्यास सज्ज झाली आहे. मग ते संकट कोणत्याही रूपात येवो, इंद्रायणी त्यासाठी खंबीर आहे असं पाहायला मिळणार. श्रीकलाच्या मनसुब्यांवर इंद्रायणी कशी मात करणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
एकीकडे इंद्रायणीला मिळालेले संकेत तर दुसरीकडे श्रीकला बद्दल गोपाळ आणि घरच्यांची वाढती आपुलकी. या सगळ्यातून इंद्रायणी श्रीकलाचं खरं रूप काय हे कसं शोधून काढणार? गोपाळच्या मनात श्रीकला बद्दल असलेल्या भावना याचा श्रीकला पुरेपूर वापर करून दिग्रसकर कुटुंबात एन्ट्री घेण्याचा तिचा प्लॅन यशस्वी होऊ देईल का नाही इंद्रायणी? इंद्रायणी या नविन आव्हानाला कशी सामोरी जाणार हे सगळं पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. एकीकडे गोपाळने केलेली श्रीकला सोबतच्या लग्नाची घोषणा, आणि दुसरीकडे इंदूच्या मनात भीतीचं सावट या सर्व घटनांच्या दरम्यान, आता इंदू विठूरायाकडे उत्तर शोधते आहे. ‘इंद्रायणी’ मालिकेच्या आगामी भागात हे सगळं पाहायला मिळणार आहे.