Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनमिळाऊ हर्षदा खानविलकरचा सामाजिक संकल्प, शिक्षणासाठी हात पुढे करून दिली खरी ‘आईपणाची’ ओळख!

हर्षदा खानविलकर यांनी नुकतंच एका विशेष उपक्रमाद्वारे हे दाखवून दिल आहे. मालिकेत 'लक्ष्मी' एक अशी आई साकारत आहे, जी आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी झटते आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 12, 2025 | 01:49 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी प्रेक्षकांच्या लाडक्या झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’ मधील ‘लक्ष्मी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री हर्षदा खानविलकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेत ती साकारत असलेली ‘लक्ष्मी’ ही एक अशी आई आहे जी आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी झटते, त्यांच्यासाठी प्रत्येक संकटाला सामोरी जाते.

खऱ्या आयुष्यातही हर्षदा यांनी ‘आईपणाची’ भावना एका विशेष उपक्रमाद्वारे जपली आहे. नुकतंच हर्षदा खानविलकरने समाजातील लहान मुलांसाठी आयोजित केलेल्या एका सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. त्यामुळेच चाहते तिला आता प्रेमाने म्हणत आहेत – “ही खऱ्या अर्थाने सगळ्यांची ‘मम्मा’ आहे!”

हर्षदा खानविलकर यांनी नुकतंच एका विशेष उपक्रमाद्वारे हे दाखवून दिल आहे. हर्षदा मालिकेत ‘लक्ष्मी’ एक अशी आई साकारत आहे, जी आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी झटते आहे. त्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत घेते आहे. या मालिकेची संपूर्ण टीम हल्लीच “चला हवा येऊ द्या” च्या एका विशेष भागात सहभागी झाली होती. या मंचावर अनेक किस्से सांगितले गेले. हर्षदा खानविलकरने आपल्या आयुष्यातील काही खणखणीत अनुभवही शेअर केले. त्याचवेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अभिजीत खांडकेकर यांनी त्यांच्या या आईसारख्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करत त्यांची “तुळा” केली ज्यातून गरजू मुलांना वह्या पुस्तक दान केली जाणार होती. या गोष्टीने हर्षदा खानविलकर यांना आश्चर्यचकित केले. यात तराजूच्या एक बाजूवर हर्षदा खानविलकर बसल्या, तर दुसऱ्या बाजूवर वह्या पुस्तकं ठेवली गेली. केवळ त्या क्षणी हे काम संपले नाही. हर्षदा खानविलकर यांनी स्वतः संकल्प केला की ती पुस्तके त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील. त्यासाठी हीच वह्या पुस्तके घेऊन त्या स्वतः पोहचल्या सांगलीला श्री दत्त विद्यामंदिर, नरसोबाची वाडी, येथे आणि येथील गरजू शाळेच्या विद्यार्थ्यांना त्या भेट म्हणून दिल्या.

Bigg Boss 19: गौरव खन्ना कॅप्टन झाल्यांनतर काही मिनिटांतच ‘बिग बॉस’ने पलटला खेळ, ‘या’ स्पर्धकाला मिळाली कॅप्टन्सी

या अनुभवाबद्दल हर्षदा खानविलकर म्हणतात, “आयुष्यात कधी कधी अनपेक्षित गोष्टी घडतात आणि त्या आत्मिक आनंद देतात कारण त्या अनपेक्षित असतात. हे वर्ष माझ्यासाठी अशाच आनंदाचे वर्ष आहे आणि याचे कारण आहे आपली झी मराठी. २०२५ च्या सुरुवातीला आमची मालिका “लक्ष्मी निवास” प्रक्षेपित झाली, ज्यात मी माझ्या मागील भूमिकांपेक्षा खूप वेगळी भूमिका साकारतेय आणि त्यासाठी मिळालेल प्रेम प्रचंड आहे. याव्यतिरिक्त आम्ही “चला हवा येऊ द्या” चा विशेष भाग शूट केला होता. जिथे माझी तुळा करून गरजू मुलांना पुस्तकदान केले जाणार होते. पहिल्यांदा मला वाटलं की हे एक प्रॅन्क असेल कारण आम्ही ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर होतो आणि तिथे प्रॅन्क होतात, पण नाही हे खरं होतं आणि माझी तुळा केली गेली. मला वाटलं कि आता ती वह्या पुस्तक शाळेतील मुलांपर्यंत पोहचवली जातील. पण नाही मला ती सुखद संधी दिली गेली आणि मला ही संधी दिल्याबद्दल झी मराठीचे खूप खूप आभार, कारण यात सर्वात विशेष गोष्ट होती ती म्हणजे ही वह्या पुस्तकं मलाच मुलांपर्यंत पोहोचवायची होती आणि हे फक्त आणि फक्त झी मराठी शक्य करू शकते.

जय जय स्वामी समर्थ; स्त्रीशक्ती, भक्ती आणि चमत्कार यांचा संगम असलेला विशेष आठवडा!

त्यांची मी आभारी आहे की त्यांनी मला अशा नेक कामाचा भाग बनवलं. मला मुलांबरोबर, त्यांच्या पालकांबरोबर, शिक्षकांसोबत वेळ घालवता आला. मुलांच्या डोळ्यातील आनंद आणि हसू पाहून मन भरून आलं. या पूर्वीदेखील झी मराठीने ‘कमळी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने गरजू मुलींसाठी सायकल वाटप केलं होत. मी खरंच धन्य आहे की मला अशा चॅनेलसोबत काम करण्याची संधी मिळाली जे सामाजिक बदल घडवण्याचं नेतृत्व हातात घेतात. आम्ही फक्त आमच्या कथा सांगत नाहीये, पण अशा प्रभावी उपक्रमांद्वारे बदल घडवत आहोत याचा आनंद आहे.”

Web Title: Actress harshada khanwilkar who played the role of lakshmi in lakshmi niwas is in the news once again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 01:49 PM

Topics:  

  • marathi actress
  • zee marathi

संबंधित बातम्या

अभिनेत्री गिरिजा ओक तरुणाईची बनतेय “नॅशनल क्रश”, प्रसिद्धीच्या झोतात अभिनेत्री
1

अभिनेत्री गिरिजा ओक तरुणाईची बनतेय “नॅशनल क्रश”, प्रसिद्धीच्या झोतात अभिनेत्री

‘होय मी जय भीमवाली…’ ’या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचे बेधडक विधान, सोशल मीडियावर चर्चेचे तुफान
2

‘होय मी जय भीमवाली…’ ’या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचे बेधडक विधान, सोशल मीडियावर चर्चेचे तुफान

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने प्रेग्नंसीमध्येही केले ‘Item Song’, शूटिंगदरम्यान झालेला मनोरंजक किस्सा
3

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने प्रेग्नंसीमध्येही केले ‘Item Song’, शूटिंगदरम्यान झालेला मनोरंजक किस्सा

५० दिवसांचा यशस्वी प्रवास! ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाने थिएटरमध्ये गाठला सुवर्ण टप्पा
4

५० दिवसांचा यशस्वी प्रवास! ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाने थिएटरमध्ये गाठला सुवर्ण टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.