(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेते आणि गायक अमोल बावडेकर यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर तात्काळ अँजिओग्राफी करण्यात आली आहे. अभिनेत्याची तब्येत आता बरी आहे. परंतु आता अभिनेत्याबाबत एक कौतुकास्पद बाब समोर आली आहे. तसेच अभिनेत्याच्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांचा नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला होता. आता अभिनेत्याला नक्की काय झाले हे जाणून घेऊयात.
नुकतेच रंगभूमीवर ‘सुंदर मी होणार’ हे नवीन नाटक सादर होत आहेत. अनेक वर्षांनी अमोल यांना प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. परंतु नाटक्याच्या दुसऱ्या प्रयोगावेळी अभिनेत्याची प्रकृती बिघडल्यामुळे ‘सुंदर मी होणार’चा प्रयोग रद्द करावा लागला. ‘सुंदर मी होणार’ या नाटकाचा प्रयोग रविवारी सकाळी पार्ल्यातील दीनानाथ नाट्यगृह येथे सादर होणार होता. मात्र अमोल बावडेकर यांना त्याआधीच हृदयविकाराचा झटका आल्याने रविवारचा प्रयोग रद्द करण्याचा निर्णय नाटकाच्या दिग्दर्शकांनी घेतला. अमोल बावडेकर यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली असून त्यांची प्रकृती आता स्थिरावली आहे.
‘Lilo And Stitch’ या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या हॉलिवूड अभिनेत्याचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन!
शनिवारी सायंकाळी वाशीमध्ये ‘सुंदर मी होणार’ नाटकाचा प्रयोग होता. तेव्हा अमोल बावडेकर यांना अस्वस्थ वाटत होते. मात्र तरीही त्यांनी तो प्रयोग पूर्ण केला. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही माहिती मिळताच नाटकाच्या दिग्दर्शकांनी सकाळी पावणे अकरा वाजता दीनानाथ नाट्यगृहातील नाटकाचा प्रयोग रद्द केला. प्रेक्षकांचे पैसे त्यांना परत करण्यात आले.
अमोल बावडेकर यांच्याविषयी बोलताना दिग्दर्शक राजेश देशपांडे म्हणाले, “डॉक्टरांनी अमोल यांचं चेकअप केल्यानंतर काहीतरी सीरियस असल्याचं त्यांना जाळवलं आणि त्यांनी तात्काळ अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला होता.” असे ते म्हणाले, पुढे त्यांनी सांगितले की, “याही परिस्थितीत अमोल यांनी डॉक्टरांना विनंती केली, की मला केवळ तीन तासांचा वेळ द्या. मी नाटकाचा प्रयोग पूर्ण करून येतो नंतर तुम्ही हवे ते करा. परंतु डॉक्टरांनी अमोलला जाण्याची परवानगी दिली नाही. प्रकृती गंभीर असताना नाटकाचा प्रयोग करण्याची तयारी दाखवली हे कौतुकास्पद आहे.” असे ते म्हणाले.
मनारा चोप्राच्या वडिलांच्या निधनावर प्रियांकाची प्रतिक्रिया, म्हणाली- ‘ते नेहमीच आमच्या हृदयात…’
तसेच, आता अमोल यांची प्रकृती ठीक नसल्याने आता अभिनेते अनिरुद्ध जोशी सुंदर मी होणार नाटकात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. लवकरच अनिरुद्धबरोबर तालमी करून नाटकाच्या पुढच्या प्रयोगात ते दिसणार आहेत. अशी माहिती दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी दिली आहे. तसेच आता ‘सुंदर मी होणार’ हे नवीन नाटक प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहे.