(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
डिस्नेच्या नवीनतम लाईव्ह-अॅक्शन चित्रपट ‘लिलो अँड स्टिच’ मध्ये शेव्ह्ड आइस मॅनची भूमिका साकारणारा अभिनेता डेव्हिड हेली केनुई बेल यांचे अचानक निधन झाले आहे. ही दुःखद बातमी त्यांच्या बहिणीने फेसबुक पोस्टद्वारे शेअर केली. पोस्टमध्ये तिने तिच्या धाकट्या भावाचे वर्णन ‘दयाळू, प्रतिभावान आणि सर्वांशी प्रेमळ’ असे केले आहे. तसेच आता अभिनेत्याच्या दुखत बातमीने शोककळा पसरली आहे.
नुकताच मोठ्या पडद्यावर अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारा अभिनेता डेव्हिड बेल त्याच्या कुटुंबासह त्याच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थित होता. दोन आठवड्यांपूर्वी हवाईच्या कपोली शहरात झालेल्या ‘लिलो अँड स्टिच’च्या प्रीमियरमध्ये डेव्हिड त्याच्या चित्रपटाबद्दल खूप आनंदी होता. तसेच हा चित्रपट प्रेक्षकांना देखील खूप आवडला. अभिनेत्याचे काम देखील चाहत्यांच्या पसंतीस आले.
मनारा चोप्राच्या वडिलांच्या निधनाने मीरा चोप्राला बसला धक्का, काय म्हणाली अभिनेत्री?
डेव्हिडच्या बहिणीने भावनिक पोस्ट केली
डेव्हिडच्या बहिणीने तिच्या भावनिक पोस्टमध्ये सांगितले की, ‘डेव्हिड तिच्या आयुष्यात आला तेव्हा ती १८ वर्षांची होती. ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट ठरली. तिने सांगितले की डेव्हिडने नेहमीच सर्व नात्यांमध्ये निःस्वार्थ प्रेम आणि आपुलकी दिली आहे.’ डेव्हिडच्या बहिणीची ही पोस्ट पाहून चाहते भावुक झाले आणि त्यांनी या पोस्टला कंमेंट केली आहे.
अभिनेता पर्यटन क्षेत्रातही सक्रिय होता
डेव्हिडला केवळ अभिनयातच रस नव्हता तर व्हॉइस ओव्हर आणि पर्यटनातही रस होता. तो कोना ब्रूचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही सक्रिय होता आणि हवाईतील कोना विमानतळावरील पीए सिस्टमवर त्याचा आवाज ऐकू येत होता, ज्यामुळे प्रवाशांना चांगला अनुभव मिळत होता.
पती सिद्धार्थ चांदेकरसाठी मितालीची भावनिक पोस्ट; म्हणाली, “तू फक्त माझा नवरा नाहीस तर…”
डेव्हिडच्या प्रतिनिधीने काय म्हटले?
अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर, त्याचे चाहते सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. चाहते, मित्र आणि सहकाऱ्यांनी या नुकसानाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. डेव्हिडचे प्रतिनिधी लाशॉना डाउनी यांनी टीएमझेडला सांगितले की, ‘हे खरोखरच हृदयद्रावक आहे. डेव्हिड केवळ एक महान कलाकार नव्हता, तर तो खरोखरच ‘अलोहा’ – सौम्य आणि प्रेमळ भावनेने जगला.’ सध्या, डेव्हिडच्या मृत्यूचे कारण सार्वजनिक केलेले नाही, परंतु त्याच्या चाहत्यांसाठी आणि कुटुंबासाठी हे एक अपूरणीय नुकसान आहे.