
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अखेर आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे, आणि ‘बिग बॉस’ प्रेमींना नव्या सीझनचं आलिशान घरं नक्की कसं आहे? हे उघड झाले आहे. ‘बिग बॉस मराठी सीझन सहाचा’च्या आलिशान घराचा फर्स्ट लूक समोर आला आहे. आजपासून ‘बिग बॉस’च्या नव्या घराचं दार उघडणार आहे, आणि सहभागी झालेल्या स्पर्धकांचा नशिबाचा गेम पालटणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घराच्या नेहमीच नवनवीन ट्विस्ट आता पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे घरात धमाल, मनोरंजन, इमोशन्स आणि राडा पाहायला मिळणार आहे.
‘बिग बॉस मराठी सीझन ६’ आलिशान घराबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस’च्या घरांचा मुख्य दरवाजा खूपच सुंदर आणि मोठा आहे. हे प्रवेशद्वार प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घराच्या दरवाज्यावर अनेक दरवाजेचे नक्षीकाम केले दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनची थीम आता दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार अशी आहे. त्यामुळे यंदाचं घरदेखील त्याप्रमाणे बनवण्यात आल्याचे दिसून आले आहे.
तसेच घरात प्रवेश करताच, ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन घराचा बेडरुम खूपच युनिक आणि हटके दिसून येत आहे. ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ची कॅप्टन रुम देखील सजवण्यात आली आहे. वाइन कलरमध्ये ही कॅप्टन रुम रंगवली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा लिव्हिंग एरियादेखील स्पर्धकांसाठी खूपच मोठा दिला आहे, प्रत्येक वीकेंडला याच लिव्हिंग एरियात बसलेल्या स्पर्धकांची शाळा घेताना रितेश भाऊ दिसणार आहेत. तसेच लिव्हिंग एरिया देखील सुंदर रंगानी आणि नक्षीकाम करून सजवण्यात आला आहे.
‘बिग बॉस मराठी सीझन ६’ या नव्या सीझनचं बाथरुमदेखील नेहमीप्रमाणे वेगळं पाहायला मिळत आहे. या बाथरुममध्ये अनेक गॉसिप, राडा आणि स्पर्धकांचे प्लॅनिंग पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांसाठी एक मोठे किचनदेखील देण्यात आले आहे. या किचनमध्ये स्पर्धकांसाठी भांडी आणि प्रत्येकासाठी एक स्पेशल कॉफी मग ठेवण्यात आला आहे. याच किचनमध्ये जेवण बनवण्यासह अनेक गेम प्लॅनदेखील शिजणार आहे. तसेच जेवणावरून या वेळी स्पर्धकांमध्ये भांडण पाहायला मिळेल का? हे येणाऱ्या भागातच समजणार आहेत.
‘बिग बॉस मराठी सीझन ६’च्या घरात किचनजवळच सर्व स्पर्धकांसाठी एक मोठी डायनिंग रुम बनवण्यात आली आहे. आरामदायी चेअर्स असणारा हा एरिया लक्षवेधी आहे. ‘बिग बॉस’चं घर नव्या रुपात, नव्या रचनेत आणि नवीन खेळाच्या नियमांसह खूप खिडक्या आणि त्याहून जास्त दारांनी सजवण्यात आलं आहे. आता १०० पेक्षा अधिक कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत स्पर्धकांना १०० दिवस काढायचे आहे. ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ मध्ये घरात एक यंदा छोटी खोली देखील दिसत आहे, जी गुलाबी रंगाच्या थीम मध्ये सजवण्यात आली आहे. जी रॉयल पद्धतीतचा लूक तयार करत आहे.
तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ च्या मोठ्या मुख्य प्रवेश दाराला जोडून गार्डन एरिया देखील सुंदर सजवण्यात आला आहे. तसेच तिथे स्विमिंग पूल देखील दिसत आहे. आजूबाजूला भरपूर आरसे आणि बसायला स्पर्धकांसाठी सोफा देखील ठेवण्यात आला आहे. आता आजपासून ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ सुरु होणार आहे. आता कोणते स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरामध्ये दिसणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. आज ते लवकरच उघड होणार आहे.