माहीने दिल्या नदीमला शुभेच्छा, जगासमोर व्यक्त केले प्रेम (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मात्र माही विज पुन्हा एकदा जय भानुशालीशी घटस्फोट झाल्यामुळे नाही तर एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. टीव्ही अभिनेत्री माही विजने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचा चांगला मित्र नदीमसोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोतून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने फोटोला कॅप्शन देत लिहिले आहे की ती त्याच्यावर खूप प्रेम करते. हे वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
माहीने दिल्या नदीमला शुभेच्छा
माहीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नदीमला केक भरवतानाचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, “मी माझ्या हृदयापासून निवडलेल्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. जो मी एक शब्दही न बोलताही माझं ऐकतो, जो माझ्यासोबत असतो कारण त्याला तसं करायचं आहे, कर्तव्य म्हणून नाही – तूच माझं कुटुंब आहेस, माझं सुरक्षित ठिकाण आहेस, माझं सर्वस्व आहेस. तू फक्त माझा सर्वात चांगला मित्र नाहीस, तर तू माझा आधार, माझी ताकद, माझं घर आहेस. तुझ्यासोबत मी जशी आहे तशी राहू शकते – दुःखी, आनंदी, भावूक, अपूर्ण – आणि तरीही मला पूर्णपणे स्वीकारल्यासारखं आणि प्रेम मिळाल्यासारखं वाटतं.
हो, कधीकधी आपल्याला राग येतो. हो, आपण भांडतो. हो, कधीकधी आपण अनेक दिवस बोलत नाही. पण शांतता कितीही वाढली तरी, तिचा शेवट नेहमी एकाच ठिकाणी होतो – आपल्यात. कारण आतून, आपल्या दोघांनाही माहित आहे की नदीम आणि माही एकच आहेत. आपले आत्मे अशा प्रकारे जोडलेले आहेत की ते शब्दांत पूर्णपणे व्यक्त करता येणार नाही.
आयुष्य नेहमी सोपे नव्हते, पण तू माझ्यासोबत असल्यामुळे प्रत्येक गोष्ट हलकी, प्रत्येक गोष्ट मजबूत, प्रत्येक गोष्ट चांगली वाटते. जेव्हा मी कमजोर असते तेव्हा तू माझा हात धरतोस, जेव्हा मी स्वतःवर विश्वास ठेवायला विसरते तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवतोस, आणि तू माझ्यावर अशा प्रकारे प्रेम करतोस की माझ्या शरीराचे असे भाग बरे होतात जे तुटलेले आहेत हे मला माहितही नव्हते.
नदीम, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे – तू जसा आहेस त्यासाठीच नाही, तर तू मला जसं अनुभव देतोस, तू माझ्यासोबत कायम ज्या पद्धतीने उभा राहतोस, तू माझं हृदय, माझं घर, माझं कुटुंब आहेस त्यासाठी. आज आणि नेहमी खूप प्रेम
14 वर्षांचा संसार मोडला, Mahhi Vij ने जय भानुशालीकडून पोटगी, देखभालीचा खर्च नाकारला
कमेंट सेक्शन बंद
माहीने नदीमच्या वाढदिवसाला त्याचा फोटो पोस्ट केलाय आणि याशिवाय मुलगी ताराच्या पेजवरूनही तिने ‘स्वीकारलेला अब्बा’ असे लिहीत फोटो पोस्ट केला आहे. दरम्यान यानंतर ट्रोलिंग होऊ शकते याची तिला पुरेपूर खात्री असल्याने तिने कमेंट सेक्शन बंद करून ठेवले आहे आणि आपल्या मनातील भावना संपूर्ण जगासमोर व्यक्त केल्यात.
कोण आहे नदीम
नदीमला आतापर्यंत बरेचदा मेगास्टार सलमान खानसह पाहण्यात आले आहे. नदीम हा सलमानच्या विश्वासातील आणि अत्यंत जवळचा असा मित्र आहे. त्याचा लहानपणापासूनचा मित्र असणारा नदीम बरेचदा अनेक कार्यक्रमांना त्याच्यासह दिसतो. याशिवाय सलमानच्या प्रॉडक्शन कंपनीचे कामही नदीम पाहतो. मात्र माही आणि नदीम यांच्या ही जवळीक कधी निर्माण झाली याबाबत अजूनही कोणतीही पुष्टी माहीने दिलेली नाही. दरम्यान आता माहीचा घटस्फोट याच कारणाने झाला असावा अशीही कुजबूज आता सोशल मीडियावर सुरू झालेली पहायला मिळतेय.






