
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस मराठी सीझन 6’चा धमाकेदार प्रोमो रिलीज झाल्यापासून चाहते हा शो पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या प्रोमोमध्ये महाराष्ट्रचा लाडका भाऊ अर्थात रितेश देशमुखचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी 6’ ११ जानेवारी २०२५ पासून सुरू होत आहे. तसेच, या नवीन सीझनची नवी थीम काय असणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. कारण या थीमवर ‘बिग बॉस’चा सगळा खेळ अवलंबून असणार आहे. शिक्षा, टास्क, नॉमिनेशन आणि कॅप्टनशिप अशा सगळ्या गोष्टी थीमवर अवलंबून असतात.
‘बिग बॉस मराठी ६’ची यंदाची थीम ही ‘बिग बॉस’च्या हिंदी सीझनमधून घेण्यात आली आहे. ‘स्वर्ग आणि नरक’. यामध्ये बरेच दरवाजे पाहायला मिळणार आहेत. परंतु सेंटर पॉईंट हा महाद्वार असणार आहे आणि या महाद्वारातून आतमध्ये प्रवेश करणं आणि मग स्वर्ग आणि नरक पार करुन ‘बिग बॉस’च्या घरात जाणं अशी एकूणच थीम ठरवण्यात आली आहे. ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना स्वर्ग आणि नरक अशा दोन भागांमध्ये विभागलं जाणार आहे. त्यानुसार त्यांना टास्क देण्यात येणार आहेत. या टास्कमधून त्यांना स्वर्ग आणि नरक निवडावं लागणार आहे. त्यापद्धतीने त्यांचा पुढचा खेळ चालणार आहे.
रितेश देशमुखचा वेळा स्वभाव आणि न दिसलेली बाजू ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण रितेश भाऊ स्वत: म्हणत आहेत. “मागचा सीझन वाजवला होता हा सीझन गाजवायचा आहे”. रितेश देशमुखला आता प्रेक्षकांची आवड-निवड कळली आहे. त्यामुळे या सीझनमध्ये रितेश देशमुखची मसालेदार होस्टिंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी ६’च्या माध्यमातून प्रेक्षकांना १०० दिवस एन्टरटेनमेंटची मेजवानी मिळणार आहे. एकाच घरात एकूण १६ – १७ स्पर्धक, १ दमदार होस्ट, वेगवेगळे टास्क, प्रत्येक आठवड्याला घराबाहेर जाणाऱ्या स्पर्धकाची धाकधूक हे सगळं शो मध्ये पाहायला मिळणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या खेळातले सदस्य हे त्या खेळातले जीव असतात. स्पर्धकच सीझन गाजवत असतात. यंदाच्या सीझनमध्येही थीमला साजेसे स्पर्धक निवडण्यात आले आहेत. यंदाच्या सीझनमध्ये तरुण स्पर्धक ९९ टक्के पाहायला मिळणार आहेत. कलाकार मंडळी, रीलस्टार, युट्यूबर आणि स्पोर्ट्स कॅटेगरीमधले स्पर्धक यंदा पाहायला मिळणार आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनच्या संभाव्या स्पर्धकांमध्ये गिरीजा ओक, रसिका सुनील, ईशा केसकर, जयवंत वाडकर, विजय पाटकर, समीर परांजपे, गौरव मोरे, अंशुमन विचारे, रोहित राऊत, डॅनी पंडित, अनुश्री माने, अर्थव रुके, गौतमी पाटील, गुणरत्न सदावर्ते, नागेश मडके, रवी काळे, लक्ष्मण भोसले या स्पर्धकांचा समावेश आहे.