Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial : ‘चिंचपूर’चे झाले ‘तुळजापूर’! आई भवानीच्या अष्टभुजा अवतारासमोर महिषासुराचा अंत निश्चित

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीवर आधारित मालिकेने कमी दिवसातच प्रेक्षकांची पसंती मिळवली. कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' मालिकेत आता साक्षात देवीच्या आगमनाचा सुवर्णक्षण आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 23, 2026 | 06:57 PM
Marathi Serial : ‘चिंचपूर’चे झाले ‘तुळजापूर’! आई भवानीच्या अष्टभुजा अवतारासमोर महिषासुराचा अंत निश्चित
Follow Us
Close
Follow Us:
  • ‘चिंचपूर’चे झाले ‘तुळजापूर’!
  • आई भवानीच्या अष्टभुजा अवतारासमोर महिषासुराचा अंत निश्चित
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीवर आधारित मालिकेने कमी दिवसातच प्रेक्षकांची पसंती मिळवली. कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत आता साक्षात देवीच्या आगमनाचा सुवर्णक्षण आला आहे. कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देवीचे चिंचपुरात पुनरागमन झाले असून, हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरत आहे. भक्तीचा महासागर आणि नामांतराचा ऐतिहासिक क्षण प्रेक्षकांना अनुभवता येईल.

गावाच्या मध्यभागी देवी तुळजाभवानी आपल्या दिव्य सिंहासनावर विराजमान झाली आहे. देवीच्या आगमनाने संपूर्ण गाव भक्तीत न्हाऊन निघाले आहे. देवीच्या समोर आराधी लोक आपला पारंपारिक पोत नाचवत जल्लोष करत आहेत, तर वयस्कर स्त्रिया डोक्यावर ‘परडी’ घेऊन भान हरपून नृत्य करत आहेत. या भावूक प्रसंगी कदम बाबा आणि पाटील देवीसमोर हात जोडून उभे राहतात. डोळ्यांत आनंदाश्रू आणून कदम बाबा मोठी घोषणा करतात.

“आई, आजपासून हे गाव तुझ्या नावाने ओळखलं जाणार. हे चिंचपूर नाही, तर आजपासून हे आई तुळजाभवानीचं ‘तुळजापूर’!”
हे नाव ऐकताच संपूर्ण आसमंत ‘तुळजाभवानीच्या’ जयघोषाने दुमदुमून जातो. त्याच क्षणी देवीच्या त्रिशूळातून विजेची एक लखलखती शलाका आकाशात झेपावते, ढगांचा गडगडाट होतो आणि देवीचा मुकुट सुवर्ण प्रकाशाने उजळून निघतो.
त्या नंतर देवीचा भक्तांशी संवाद आणि उलगडणारा मायेचा भावबंध प्रेक्षकांना अनोख्या कथेची अनुभूती देणार आहे.
महिषासुराचे भयानक कारस्थान: ‘महिषासूरपूर’चा डाव?

श्रद्धा, तर्क आणि परंपरेचा संगम; ‘देवखेळ’ मध्ये प्राजक्ता साकारणार अनोखी भूमिका, सांगितला अनुभव

एकीकडे तुळजापुरात आनंदाचे भरते आले असताना, दुसरीकडे महिषासुराच्या दालनात संताप आणि सूडाचा अग्नी धगधगत आहे. देवीच्या वाढत्या शक्तीने महिषासुर प्रचंड रागात आहे. तो गर्जना करतो की, “तुळजापूर लवकरच महिषासूरपूर बनणार!”
आपल्या काळ्या शक्तीचा वापर करत तो हवेत हात फिरवतो आणि त्याच्यासमोर जांभळ्या प्रकाशात एक मोठी झाकलेली थाळी प्रकट होते. या थाळीत असे कोणते रहस्य लपले आहे, ज्याच्या जोरावर महिषासुर देवीला आव्हान देणार? हे पाहणे आता अत्यंत थरारक ठरणार आहे.

महिषासुराचे षडरिपू काम, क्रोध, मद, मोह, माया आणि मत्सर या रिपूंनी हार पत्करुन देवी तुळजाईच्या पायाशी शरण गेले. त्यामुळे प्रत्येक वेळा असूरांनी प्रत्येक वेळेला केलेलं कट कारस्थान तुळजाईने हाणून पाडलं. आता वेळ जवळ आलीये महिषासुराच्या वधाच्या. महिषाच्या पापांचा घडा भरत आला असून देवीच्या अष्टभूजा रौद्ररुपासमोर महिषासूर हादरुन जाणार आहे. या होणाऱ्या महायुद्धाची नांदी ही भक्ती, शक्ती आणि संघर्षाचा हा अद्भूत सोहळा कलर्स मराठीच्या प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे हे नक्की.

Marathi Serial : ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचा अंतिम अध्याय सुरु; स्वामींचे महानिर्वाणाचे गूढ संकेत !

Web Title: Colours marathi serial aai tuljabhavani news update mahishasuras end is certain before the eight armed incarnation of aai bhavani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • aai tulajabhavani
  • Colours Marathi

संबंधित बातम्या

Marathi Serial : ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचा अंतिम अध्याय सुरु; स्वामींचे महानिर्वाणाचे गूढ संकेत !
1

Marathi Serial : ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचा अंतिम अध्याय सुरु; स्वामींचे महानिर्वाणाचे गूढ संकेत !

Bigg Boss Marathi 6 : राशनच्या गोण्यांसाठी बिग बॉसच्या घरात होणार तुफान राडा, ‘हे’ दोन स्पर्धक आमनेसामने, पाहा प्रोमो
2

Bigg Boss Marathi 6 : राशनच्या गोण्यांसाठी बिग बॉसच्या घरात होणार तुफान राडा, ‘हे’ दोन स्पर्धक आमनेसामने, पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi 6 : मैत्रीत पडणार फूट, ‘या’ दोन स्पर्धकांनी रूचिताला पाठवलं शेणाच्या घरात, कॅप्टन्सीसाठी रंगली चूरस
3

Bigg Boss Marathi 6 : मैत्रीत पडणार फूट, ‘या’ दोन स्पर्धकांनी रूचिताला पाठवलं शेणाच्या घरात, कॅप्टन्सीसाठी रंगली चूरस

Bigg Boss Marathi 6: घरातील वाद टोकाला, अनुश्रीच्या वागण्यामुळे राकेश बापटचा संयम सुटला; घर सोडण्याचा दिला इशारा
4

Bigg Boss Marathi 6: घरातील वाद टोकाला, अनुश्रीच्या वागण्यामुळे राकेश बापटचा संयम सुटला; घर सोडण्याचा दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.