(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘अभंग तुकाराम’ चा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मराठी इंडस्ट्रीत त्यांनी आजवर अनेक मराठी सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसेच त्यांनी अनेक वैविध्यपूर्ण चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षणाचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता अशातच ते लवकरच एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहे.
‘परम- सुंदरी’ने घेतले लालबागच्या राजाच्या दर्शन, नुश्रत देखील पोहचली बाप्पाच्या दरबारात
दिग्पाल लांजेकर ‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. हा चित्रपट जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित असल्याचं त्यांनी सांगितले आहे. ‘अभंग तुकाराम’ चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची भूमिका साकारणार आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या आवलीच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसणार आहे. तसेच चित्रपटाबाबत सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट शेअर करून एक छोटीशी झलक देखील प्रेक्षकांना दाखवली आहे. पोस्टर पाहूनच प्रेक्षकांची हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.
‘अभंग तुकाराम’ चित्रपटात ‘या’ कलाकारांची झलक
‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात अभिनेता अजिंक्य राऊत, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, निखील राऊत, तेजस बर्वे आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णीसु यांसारखे कलाकार काम करताना दिसणार आहेत. यासह या चित्रपटात इतरही काही कलाकार पाहायला मिळणार आहेत. तसेच हा चित्रपट पाहताना नक्कीच प्रेक्षकांना खूप आनंदी होणार असून, खूप गोष्टी अनुभवयाला मिळणार आहेत.
सोनू सूदने मुंबईतील एका पॉश भागात विकले स्वतःचे घर, १३ वर्षात मिळवला एवढा फायदा
सोशल मीडियावर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करण्यात आले असून याला “भक्ती, प्रेरणा आणि चैतन्याचा सोहळा! जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा..” अशा कॅप्शनसह शेअर केले आहे. ‘अभंग तुकाराम’ ७ नोव्हेंबरपासून सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा योगेश सोमण यांनी लिहिली आहे, तर पटकथा स्वतः दिग्पाल लांजेकरने लिहिली आहे.
अभिनेता अजिंक्य राऊतनेही या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ‘अभंग तुकाराम’ चित्रपटात अजिंक्य राऊत मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना दिसणार आहे. अभिनेत्याचे चाहते त्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘अभंग तुकाराम’मध्ये अजिंक्यसह विराजस कुलकर्णी आणि तेजस बर्वेही पाहायल मिळणार आहेत. पोस्टखाली त्यांनाही टॅग करण्यात आले आहे.