Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजू राठोडने रचला इतिहास; गायकाला मिळाला अ‍ॅलन वॉकरच्या कॉन्सर्टमध्ये ओपनिंग करण्याचा मान!

‘गुलाबी साडी’ फेम गायक संजू राठोडने इतिहास रचला आहे. पहिला मराठी गायक ज्याला सनबर्न एरेना, अ‍ॅलन वॉकरच्या कॉन्सर्टसाठी ओपनिंग करण्याचा मान प्राप्त झाला आहे. हे पाहून चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 11, 2024 | 02:10 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही वर्षांत मराठी संगीत क्षेत्राने जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळवली आहे, ज्यात अनेक प्रतिभावान कलाकारांचा मोठा वाटा आहे. असाच एक टॅलेंटेड गायक संजू राठोड यांचा देखील समावेश आहे. संजूच्या ‘गुलाबी साडी’ आणि ‘नऊवारी’ गाण्यांना लाखो लोकांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे मराठी संगीतक्षेत्रात त्याने एक विशिष्ट असं स्थान निर्माण केलं आहे. संजू राठोड आंतरराष्ट्रीय कलाकारासमवेत शो सुरू करणारा पहिला मराठी कलाकार ठरला असून, या खास क्षणामुळे मराठी संगीत क्षेत्रामध्ये एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे.

म्युझिक कॉन्सर्ट मध्ये, संजूने आपल्या सुपरहिट ‘गुलाबी साडी’ गाण्याने प्रेक्षकांना भारावून सोडलं. ‘गुलाबी साडी’ गाणं ५० मिलिअनपेक्षा अधिक वेळा Spotify वर सर्वाधिक ऐकलं गेलेलं मराठी गाणं ठरला आहे. त्यानंतर त्याचं नुकतंच रिलिझ झालेलं ‘काळी बिंदी’ गाणं देखील सादर केलं, जे सध्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर ट्रेंड होत असून युट्युबच्या इंडिया टॉप म्युझिक व्हिडिओ चार्टवर दिसत आहे. त्याच्या जोशपूर्ण परफॉर्मन्सने संपूर्ण प्रेक्षकांना उत्साहाने भारावून सोडले आहे. पारंपरिक महाराष्ट्रीय संगीताची खासियत आणि त्यात आधुनिक शैलीने गाणं तयार करण्याच्या त्याच्या या अनोख्या कौशल्यामुळे आतंरराष्ट्रीय डीजे स्टेजवर त्याची झालेली निवड ही योग्य आहे.

हे देखील वाचा- आलिया भट्टने कल्की दिग्दर्शक नाग अश्विनसोबत केली हातमिळवणी, अभिनेत्री मोठ्या प्रोजेक्टसाठी करणार काम!

अ‍ॅलन वॉकरच्या ग्लोबल इलेक्ट्रॉनिक साऊंडसोबत आपल्या महाराष्ट्राची समृद्ध संगीत कला सादर करण्यात आल्यामुळे इतर प्रादेशिक कलाकारांना नक्कीच एक नवी उमेद मिळाली आहे. पहिल्यांदाच मराठी गायकाला अ‍ॅलन वॉकरच्या कॉन्सर्टसाठी ओपनिंग करण्याचा मान प्राप्त झाला आहे. या संधीचे संजू राठोड याने सोने केले आहे. या संधीविषयी व्यक्त होताना संजू राठोड म्हणाला की, “अ‍ॅलन वॉकरसारख्या ग्लोबल आयकॉनसमोर परफॉर्म करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती आणि मराठी संगीताला आंतरराष्ट्रीय मंचावर सादर करण्याची ही एक मोठी संधी होती.” असे म्हणून त्याने आपले मन व्यक्त केले आहे.

 

चाहत्यांनी देखील कॉन्सर्टविषयी उत्साह व्यक्त केला आणि मनापासून आनंद घेतला. संजू राठोडला बल आयकॉनसमोर परफॉर्म करताना पाहून चाहत्यांना देखील खूप आनंद झाला आणि त्यांनी गायकाला चांगला प्रतिसाद दिला आहे. भारत आणि दक्षिण आशियामधील Believe कंपनीच्या आर्टिस्ट सर्विसेसच्या डायरेक्टर शिल्पा शारदा यांनी म्हटले की, “संजू राठोडसोबतचे हे कोलॅबोरेशन खूप प्रेरणादायी आहे. संजू हा सनबर्न एरिना मंचावर परफॉर्म करणारा पहिला मराठी कलाकार आहे, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. टॅलेंटेड संजूची अप्रतिम गाणी केवळ प्रादेशिकच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर सुध्दा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे, ‘गुलाबी साडी’ हे त्यापैकी एक गाणं.” असे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा- कोण आहे ‘पुष्पा २’ मधील श्रीलीला? अभिनेत्रीची सोशल मीडियावर होतेय चर्चा!

सध्या त्याच्या ‘गुलाबी साडी’ गाण्याची यशानंतर नंतर चाहते आता ‘काळी बिंदी’ हे गाणं एन्जॉय करत आहेत. हे गाणे देखील सगळीकडे वाजताना दिसत आहे. तसेच गायक संजू राठोड लवकरच त्याची नवनवीन गाणी घेऊन चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: History created by sanju rathod the singer had the honor of opening for alan walker in concert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 02:08 PM

Topics:  

  • marathi entertainment
  • sanju rathod

संबंधित बातम्या

“तुम्ही प्रेम करता म्हणजे नक्की काय करता…?” ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांच्या ‘आरपार’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच
1

“तुम्ही प्रेम करता म्हणजे नक्की काय करता…?” ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांच्या ‘आरपार’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

‘घरत गणपती’ चित्रपटगृहात पुन्हा झळकणार, गणेशोत्सवात धमक्यात साजरा होणार!
2

‘घरत गणपती’ चित्रपटगृहात पुन्हा झळकणार, गणेशोत्सवात धमक्यात साजरा होणार!

‘प्रेक्षकांचं प्रेम पाहून आईने काय कमावलं याची प्रचिती…’, ज्योती चांदेकरांची लेक झाली भावुक; म्हणाली- ‘आई अचानक गेली’
3

‘प्रेक्षकांचं प्रेम पाहून आईने काय कमावलं याची प्रचिती…’, ज्योती चांदेकरांची लेक झाली भावुक; म्हणाली- ‘आई अचानक गेली’

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा
4

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.