
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी ६ चं पर्व सुरू झाल्यापासून घरात रोज नवीन राडे पाहायला मिळत आहेत. विकेंडच्या वाराला भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने अनेक जणांची शाळा घेतल्याचे आपण पाहायलं असेल. नुकतीच घरात एक वादाची ठिणगी पडली आहे. नेहमी शांत आणि ‘चिल’ राहणारा अभिनेता राकेश बापट आज चांगलाच संतापलेला पाहायला मिळणार आहे. निमित्त ठरलं आहे ते म्हणजे अनुश्री माने हिचं वागणं. घरात बेडवरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की राकेशने थेट घर सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अनुश्रीच्या काही विधानांमुळे राकेशचा पारा चढला आणि त्याने तिला कडक शब्दात सुनावले. या वादात घरातील इतर सदस्यही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, मात्र राकेशचं डोकं चांगलंच गरम झालं आहे. कलर्स मराठीने एक नवीन प्रोमो शेअर केला आहे ज्यात घरात जोरदार झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेमका वाद काय झाला पाहुया…
राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यातील संवाद:
घरातील वातावरणात तणाव निर्माण झाला जेव्हा अनुश्री आक्रमकपणे म्हणाली, “मला कोणीही माझ्या बेडवरून हलवू शकत नाही.” तिने पुढे राकेशला उद्देशून म्हटले, “जिथे तू हात धरून मला उठवलंस ना, तिथेच माझ्या डोक्यात गेलास तू.” अनुश्रीचं हे बोलणं ऐकून राकेशचा संयम सुटला. तो संतापून म्हणाला, “हे बोलणं चुकीचं आहे. Do not dare to say that again. आयुष्यात मी २५ वर्षं एवढं काम केलं आहे, कोणाची हिंमत आहे की मला असं कोणी बोलेल?” या वादाने इतकं गंभीर वळण घेतलं की राकेश चिडून ओरडला, “मला या घरात आता थांबायचं नाहीये!” आणि तो तिथून निघून गेला.
कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. यावर एका नेटकऱ्याने कमेंट मध्ये लिहिले, ”अनुश्री जेवढा आपल वय आहे तेवढा राकेश भाऊचा अनुभव आहे”, काहींनी राकेश ला समर्थन दिले आहे. तर काहींनी कमेंट्स मध्ये अनुश्रीला चावी चोर असं देखील म्हटलं आहे. अशा अनेक कमेंट्सचा वर्षाव नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केला आहे.