Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mandar Jadhav : “दत्तगुरुंची इच्छा म्हणून मी मालिकेत…” हे काय म्हणाला अभिनेता मंदार जाधव

Mandar Jadhav :ऑडिशनला दिडशे मुलं ते म्हणाले तुझा शर्ट काढ; सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेता मंदार जाधवची कशी झाली मराठी मालिकेत एन्ट्री, जाणून घ्या.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 03, 2026 | 05:05 PM
Mandar Javdhav

Mandar Javdhav

Follow Us
Close
Follow Us:
  •  “दत्तगुरुंची इच्छा म्हणून मी मालिकेत…”
  • अभिनेता मंदार जाधवने सांगितला ऑडिशनचा किस्सा
Mandar Jadhav shares his journey from Hindi TV to Marathi industry: मालिका विश्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून मंदार जाधव कायम चर्चेत दिसतो. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून जयदीपच्या भुमिकेतून मंदार घराघरात पोहोचला. मंदार या आधी हिंदी मालिकांमध्ये काम करायचा पण एक वेळ अशी आली की त्याचं नशिब खऱ्या अर्थाने पालटलं. मराठी मालिकांमध्ये काम करण्याची संधी कशी मिळाली हे मंदारने सांगितलं आहे.

एका मुलाखतीत मंदारने सांगितलं की, त्याची पहिली मालिका ‘अल्लीदन’. या मालिकेतून त्याने अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मंदारने अनेक छोट्या मोठ्या हिंदी मालिकेत काम करत असताना त्याला एका मराठी मालिकेत मुख्य भूमिकेसाठी विचारण्यात आलं. यामागे देखील खूप मोठा किस्सा असल्य़ाचं त्याने सांगितलं आहे.

Tharala Tar Mag : एकमेंकींचे केस उपटले, हाणमारी केली आणि त्यानंतर…. ‘ठरलं तर मग’ च्या सेटवर नेमकं घडलं तरी काय?

मंदार जाधवने पहिल्यांदा ‘अल्लीदन’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर त्याने इतर मालिका आणि क्राइम शोमध्ये काम केलं. अशातच आता ‘सर्व काही’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने तो मराठी मालिकांकडे कसा वळला याबद्दल सांगितलं आहे. मंदारने यावेळी त्याची पहिली मालिका ‘श्री गुरुदेव दत्त’ त्याला कशी मिळाली यामागचा किस्सा सांगितलं आहे.

मंदार म्हणाला की, स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ ही त्याची पहिली मराठी मालिका. या मालिकेतील दत्तगुरुंच्या भुमिकेसाठी त्याची निवड झाली खरी पण त्यामागे देखील एक ट्विस्ट होता. खरंतर या मालिकेसाठी मंदारला नाही तर त्याचा भाऊ मेघन याला फोन आलेला. पण मेघन आधीच एका मालिकेत व्यस्त होता त्यामुळे त्याला ही मालिका करणं शक्य नव्हतं. तेव्हा मेघनने माझं नाव सुचवलं. मेघनने सांगितलं की, माझा भाऊ देखील याच क्षेत्रात काम करतो तुम्ही त्याची एकदा ऑडीशन घेऊ शकता.

मंदार पुढे असं देखील म्हणाला की मराठीत काम करायला काहीच अडचण नव्हती पण पाहिजे तशा ऑफर येत नव्हत्या. पुढे मंदार असं देखील म्हणाला की, पहिलाीच मराठी मालिका त्यात पण भुमिका आव्हानात्मक होती. कारण दत्तगुरु ऑनस्क्रिन साकारण मोठा टास्क होता. पण जे तुमच्या नशिबात लिहिलेलं असतं तेच घडतं त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी मिळायचं ते तुम्हाला मिळतच.

मंदारने पुढे आणखी किस्सा सांगितला की, दत्तगुरुंच्या मालिकेसाठी दिग्दर्शक संतोष देवधर यांना सगळं श्रेय जातं. मेघनच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी मला कॉल केला. मी त्यांना म्हणालो सर मला मराठी मालिका करायची आहे पण, मला पौराणिक किंवा ऐतिहासिक मालिकेतून एन्ट्री घ्यायची आहे की नाही याबद्दल गोंधळ उडालेला आहे. तरी त्यांनी मला सांभाळून घेतलं.

Raja Shivaji Show Cancel : प्रेक्षकांमध्ये नाराजी! ना पूर्वकल्पना, ना काही मेसेज; सिनेमाचा शो अचानक झाला कॅन्सल

मंदारने सांगितला ऑडिशनचा किस्सा
मंदार पुढे म्हणाला, ऑडिशनच्या वेळी भेट झाली ती निर्माते दीपक देऊळकर यांची. मी अंधेरीला त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा तिथे दत्तगुरुंच्या भुमिकेसाठी 150 मुलं ऑडिशनला आलेली. तिथे मला स्क्रिप्ट दिली मी हिंदीमध्ये ऐतिहासिक, पौराणिक मालिका केल्या होत्या. त्यामुळे मला पौराणिक भुमिकांची तशी सवय होती. त्यामुळे मी आत्मविश्वासाने ऑडीशन दिली. त्यांना ती आवडली.

तेव्हा त्यांनी मला तू शर्ट काढशील का असं विचारलं मी म्हटलं का सर? ते म्हणाले नाही आम्हाला तुझी शरीरयष्टी पाहायची आहे. कारण ही जी भूमिका आहे त्यात तुझ्या अंगावर काही नसणार आहे. रुद्राक्ष आणि माळा असतील. मग मी शर्ट काढला तेव्हा मला खूप संकोच वाटला होता. त्यांनी रेकॉर्ड वगैरे केलं मी फिट होतो पण, तितका नाही. मग मी घरी आलो.नंतर मला फोन आला की दत्तगुरुंच्या भूमिकेसाठी आम्ही तुझी निवड करत आहोत. तू तुझी बॉडी बनव. तयारी कर. आणि अशा पद्धतीने माझी मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री झाली. त्यामुळे मला असं वाटतं की दत्त गुरुची ही इच्छा होती की मी ही भूमिका साकारावी.” आणि आज जरी मी अनेक मराठी मालिका केल्या तरी दत्तगुरुंची मालिका माझ्यासाठी कायमच जवळची असेल.

Raja Shivaji Show Cancel : प्रेक्षकांमध्ये नाराजी! ना पूर्वकल्पना, ना काही मेसेज; सिनेमाचा शो अचानक झाला कॅन्सल

Web Title: I entered the marathi serial actor mandar jadhav told the story of the audition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • star pravah serial

संबंधित बातम्या

प्रशांत दाजी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेता अमर जाधव आनंदी मालिकेतून दिसणार नव्या भुमिकेत
1

प्रशांत दाजी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेता अमर जाधव आनंदी मालिकेतून दिसणार नव्या भुमिकेत

Tharala Tar Mag : एकमेंकींचे केस उपटले, हाणमारी केली आणि त्यानंतर…. ‘ठरलं तर मग’ च्या सेटवर नेमकं घडलं तरी काय?
2

Tharala Tar Mag : एकमेंकींचे केस उपटले, हाणमारी केली आणि त्यानंतर…. ‘ठरलं तर मग’ च्या सेटवर नेमकं घडलं तरी काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.